डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक व जयंती उत्सव समिती तर्फे गरजू विद्यार्थिनींना सायकल वाटप

डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक व जयंती उत्सव समिती तर्फे गरजू विद्यार्थिनींना सायकल वाटप

वृत्त एकसत्ता न्यूज

श्रीपूर / प्रतिनिधी दिनांक 25/06/2025 :

श्रीपूर(तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर) येथील श्री चंद्रशेखर विद्यालयात आज डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे वतीने गरजू विद्यार्थिनींना कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ यशवंतराव कुलकर्णी यांच्या हस्ते सायकली वाटप करण्यात आल्या. 

यावेळी डॉ यशवंतराव कुलकर्णी यांनी या उपक्रमाचे कौतुक केले ते  बोलताना म्हणाले की डॉ बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना अभिप्रेत असलेलं समाज कार्य झाले आहे. जयंतीनिमित्त डीजे लाऊन धांगडधिंगा घालण्यापेक्षा शालेय विद्यार्थ्यांना उपयोगी पडेल अशा वस्तुंचे वाटप झाले पाहिजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीच्या पुर्वसंध्येला हा स्तुत्य उपक्रम होत असल्याचे पाहून समाधान वाटले.

 या वेळी आरपीआय चे तालुका अध्यक्ष मिलिंद सरतापे मौला पठाण आरपीआयचे जिल्हा सचिव भारत आठवले स्मारक समितीचे सर्वेसर्वा संदीप घाडगे यांनी आपले विचार व्यक्त केले यांना कार्यक्रमास आरपीआय चे युवक प्रदेश उपाध्यक्ष किरण धाईंजे माळशिरस तालुका अध्यक्ष मिलिंद सरतापे आरपीआय चे जिल्हा संघटक तुकाराम बाबर जिल्हा सचिव भारत आठवले मौला पठाण नगरसेवक प्रकाश नवगिरे नगराध्यक्षा पती अशोक चव्हाण कारखान्याचे शेतकी अधिकारी कुमठेकर आयटी सेल तालुका प्रमुख प्रविण साळवे आरपीआय तालुका उपाध्यक्ष बापूसाहेब पोळके ज्येष्ठ पत्रकार बी टी शिवशरण स्मारक समितीचे अध्यक्ष राजाभाऊ सुरवसे जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष समाधान लांडगे गौतम, आठवले जिगरबाज ग्रुप चे संस्थापक राजरत्न नाईकनवरे स्मारक समितीचे पदाधिकारी शैलेश शेंडगे नागेश काटे गौतम आठवले म्हाळुंगे भगवान भोसले प्राचार्य पांडुरंग बनसोडे  उप मुख्याध्यापक गवळी  व सर्व शिक्षक शिक्षीका व शिक्षकेतर स्टाफ उपस्थित होता

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या