🔵 आणि अखेर वैष्णवी प्रकरण बंद पडले

 🔵 आणि अखेर वैष्णवी प्रकरण बंद पडले

वृत्त एकसत्ता न्यूज

संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई.

दिनांक 12/06/2025 : 

आपल्या महाराष्ट्रात गेल्या चार सहा महिन्यात जेम्स बॉण्ड पत्रकारांनी हैदोस माजवला आहे.  प्रथम देशमुख हत्याकांड यावर जवळजवळ दीड दोन महिने सर्व मराठी चॅनल व त्यांचे अति हुशार पत्रकार यांनी आपापल्या पद्धतीने तपास करून एक मोठी मीडिया ट्रायल चालवली. देशमुख प्रकरण बंद पडले तेव्हा डॉक्टर  वळसंगशकर प्रकरणावर मराठी पत्रकारिता आपल्या आपली अक्कल पाजळत होती. तोपर्यंत वैष्णवी हगवणे प्रकरण झाले मग काय क्षणाक्षणाला ब्रेकिंग न्यूज आणि बार्किंग न्यूज सुरू झाल्या. वैष्णवी  प्रकरणात या मराठी पत्रकारांनी फक्त शिक्षा जाहीर करण्याचे राहिले होते. आम्हाला वाटत होते आता हे मराठी पत्रकार न्यायालयात जोपर्यंत हगवणे प्रकरणातील आरोपींना जन्मठेप किंवा फाशी होत नाही तोपर्यंत गप बसणार नाही. 

आपल्या महाराष्ट्रात मीडिया ट्रायल चालवण्याचा फार मोठा धंदा होऊन बसला आहे मग दाभोळकर प्रकरण असो किंवा पानसरे प्रकरण असो हगवणे प्रकरण जोशात असताना त्यावरील चर्चा गरमागरम सुरू असताना एकदम बंद पडल्या आणि आता मराठी चॅनलनी एक नवीन सुपारी घेतलेली आहे.

  *भाऊबंदकीची युती 

राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांची बंधुप्रेमाच्या आणि एकत्रीकरणाच्या चर्चेशिवाय मराठी चॅनल वर काहीही दिसून येत नाही. या दोघांचे भांडण कशावरून झाले आहे तर फक्त श्रेयवाद व नेतृत्व कोणाकडे द्यायची यावरून झालेली आहे. याला कोणतीही तत्त्वाची बाजू नाही अगर विचाराची बाजू नाही. गेली सुमारे वीस वर्षाहून अधिक काळ हे दोन्ही भाऊ एकामेकावर कांगावे, कोरडे ओढत व वार  करत होते.आता दोघांनाही त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ठाकरे बँड कायम राखण्यासाठी एकत्र यावे लागेल.अशी मराठी चॅनल वाल्यांनाच मोठी खाज उठली आहे. या मराठी चाय बिस्कुट पत्रकारांना मोठी आशा निर्माण झाली आहे. त्यांना ठाकरे बंधू एकत्र येतात की नाही यावर काही कर्तव्य नाही पण एकत्र आले तर ती भाजपाला किंवा संघ परिवाराला मोठा धोका निर्माण होईल अशी दिवा स्वप्ने या चाय बिस्कुट पत्रकारांना दिसू लागली आहेत.

 यांना हे लक्षात येत नाही भाजप असो नाहीतर संघ परिवार असो. हे सर्व प्रकारच्या संकटातून टिकून तावून सुलाखून पार पडलेले आहेत. जर आपल्याला आपल्या नेत्याची विचार पटले नाहीत तर बाजूला होणे पण आपल्या मातृपक्षावर किंवा मातृसंघटनेवर भाजपवाल्यांनी अगर संघवाल्यांनी कधीही वार केले नाही किंवा पर्यायी पक्ष ,पर्यायी संघटना काढून आपला मूळ पक्ष कमकुवत करण्याचा प्रयत्न केला नाही आणि आपला अहंकार दुखावला की वेगळे पक्ष काढणारे हे एकत्र येऊन भाजपची काहीही नुकसान करू शकणार नाही. हे नेते म्हणत आहेत की महाराष्ट्राच्या मनात असेल ते होईल.

 महाराष्ट्राच्या मनात काय आहे हे एकदा पाहणे आवश्यक आहे. सत्तेवर असताना अनेक वर्षे परप्रांतीयांना कंत्राटे देऊन ज्यांनी आपली घरे भरली. त्यांची संपत्ती एकदा ईडीच्या आणि आयकाराच्या नजरेची यावी ज्यांनी मराठी मराठी म्हणून घोष लावत मराठी माणसाला कायमचे गरीब ठेवले. वडापाव विकायला लावले. त्यांनी आता मराठी माणसाची फार काळजी करू नये. मुंबई ठाणे पुणे व नाशिक याशिवाय महाराष्ट्रातील 26 जिल्ह्यामध्ये मराठी माणूस आहे व त्याला फक्त आणि फक्त महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्ती आहे हे नकळण्या एवढा मराठी म्हणून दुध खुळा नाही. पत्रकारांनी कितीही आपला पार्श्वभाग बडवला तरी ते भाजप व संघ याचे काहीही वाकडे करू शकत नाहीत. ही युती होत नाही तोपर्यंत ह्या चर्चा चॅनल वर चालूच राहतील. बाष्कळ बडबडी ऐकायला मिळतील. हे सहन करावयाची मराठी माणसांनी मनाची तयारी ठेवावी.

ॲड अनिल रुईकर 

 98 232 550 49 

इचलकरंजी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या