सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया सुविधा केंद्राचे उद्घाटन संपन्न
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई.
दिनांक 28/06/2025 : अकलूज, सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रीसर्च शंकरनगर अकलूज येथे प्रथम वर्ष अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया सुविधा केंद्राचे उद्घाटन दिनांक 28 जून 2025 रोजी डॉ. मोहन देशपांडे यांच्या हस्ते पार पाडल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण ढवळे यांनी दिली. शैक्षणिक वर्ष 2025 - 26 मध्ये प्रथम वर्ष अभियांत्रिकी मध्ये प्रवेश घेऊ इच्छित असणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रिये दरम्यान येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी व प्रवेश प्रक्रिया समजून घेण्यास मदत करण्यासाठी या प्रवेश प्रक्रिया केंद्राचा उपयोग होणार आहे.
सदर उद्घाटनास संस्थेचे प्राचार्य, सर्व विभाग प्रमुख, सर्व शिक्षक व शिक्षकेतर सेवक तसेच विद्यार्थी उपस्थित होते. सदर सुविधा केंद्राचे प्रमुख म्हणून प्रा. गौरव देशपांडे व प्रा. वैभव रिसवडकर हे काम पाहतील.
0 टिप्पण्या