🟨 ह.भ.प. गणेश महाराज आवजी "वारकरी भूषण" पुरस्काराने सन्मानित

🟨 ह.भ.प. गणेश महाराज आवजी

"वारकरी भूषण" पुरस्काराने  सन्मानित 

वृत्त एकसत्ता न्यूज

आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई.

 दिनांक 23/06/2025 :

 विश्व माऊली श्री. ज्ञानदेव श्री. तुकाराम महाराज पालखी सोहळा पुणे मुक्कामी असताना  कात्रज येथे दिव्याध्यास चॅरिटेबल ट्रस्ट माऊली गुरुकुल आयोजित पावन धाम मठाचे अधिपती ह.भ.प. महादेव महाराज बोराडे तसेच प्रसिद्ध आहार तज्ञ डॉ. दीक्षित  उपस्थित अखिल वारकरी मंडळाचे अध्यक्ष ह.भ.प. आर. के. शेठ रांजणे, मा. नगरसेवक तांबे, आदर्श शिक्षक  डिंबळे ,  बेलदरे पाटील आदी सर्व मान्यवर वारकऱ्यांच्या उपस्थितीत  वैष्णव वारकरी संप्रदाय संस्था दक्षिण पूर्व हवेली पुणे चे संस्थापक ह.भ.प. गणेश महाराज आवजी यांना "वारकरी भूषण"  पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

ह भ प गणेश महाराज आजी यांना वारकरी भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याबद्दल सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. शरद जोशी विचार मंच शेतकरी संघटना  महासंघाचे महाराष्ट्र प्रदेश संपर्क व प्रसिद्धीप्रमुख आणि नॅशनल युनियन बॅकवर्ड मायनॉरिटी महासंघ दिल्ली अर्थात एन.यू.बी.सी. चे प्रदेश उपाध्यक्ष सेवाजेष्ठ पत्रकार भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे (अकलूज) यांनीही ह भ प आवजी महाराज यांचे भ्रमणध्वनी वरून विशेष अभिनंदन करून त्यांच्या भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा व्यक्त केल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या