समाजसेवक संजय परशुराम जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त ॲम्बुलन्स लोकार्पण सोहळा
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलन : भाग्यवंत ल.नायकुडे, अकलूज.
(दुर्गापूरा, जयपूर येथील थ्री स्टार हॉटेल "SHEERHA" सूट नं. 202 मधून सकाळी 7:35 वा.)
दिनांक 16/06/2025 :
परशुराम नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक समाजसेवक संजय परशुराम जाधव (मा. सरपंच औताडे- हांडेवाडी) यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे कडून वैष्णव वारकरी संस्थेस व पंचक्रोशीतील वारकरी मंडळी साठी ॲम्बुलन्स (रुग्णवाहिका) लोकार्पण सोहळा व व फराळाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
यावेळी आपल्या 12 गावातील विश्वस्त भजननिष्ठ यांचे संजयजी जाधव व परिवार यांच्या वतीने वारकरी सन्मान करण्यात येणार आहे.
हा कार्यक्रम सोमवार दिनांक 16/06/2025 रोजी सकाळी 9 ते 11 या वेळेत होणार आहे.
समाधान लॉन्स, टाटा कार शोरूम शेजारी हांडेवाडी येथे सकाळी 10 वाजता लोकार्पण सोहळा होईल.
तरी या सोहळ्यास वैष्णव वारकरी संप्रदाय संस्था दक्षिण पूर्व हवेली चे सर्व पदाधिकारी, सभासद सदस्य, गावकरी यांनी उपस्थित राहण्याचे जाधव परिवार आणि वैष्णव वारकरी संप्रदाय संस्थेच्या वतीने आवाहन करण्यात आले असल्याची माहिती ह.भ.प.गणेश महाराज आवजी (संस्थापक, वैष्णव वारकरी संप्रदाय संस्था, दक्षिण पूर्व हवेली पुणे ) यांनी सांगितली.

0 टिप्पण्या