स्व. सौ. सुशीला रतनचंद दोशी यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ संपन्न

स्व. सौ. सुशीला रतनचंद दोशी यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ संपन्न

वृत्त एकसत्ता न्यूज

आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई.

दिनांक 29/06/2025 :

रत्नत्रय इंग्लिश मिडीयम व कनिष्ठ महाविद्यालय मांडवे येथे स्व. सौ. सुशीला रतनचंद दोशी यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रम प्रसंगी विद्यार्थ्यांना अभ्यास करत असताना अभ्यास कौशल्ये आत्मसात केली पाहिजे.कोणताही विषय शिकत असताना त्या विषयाची आवड असणे आवश्यक आहे व त्या विषयामगील नाॅलेज समजून घेतले पाहिजे.विद्यार्थ्यांचा ८०% वेळ हा अभ्यास करण्यासाठी व २०% वेळ हा रिव्हीजन करण्यासाठी गेला पाहिजे तसेच एखादी गोष्ट आपल्याला शिकायची असेल तर ती अगोदर दुसऱ्यांना शिकवता आली पाहिजे असे मार्गदर्शन विद्यार्थ्यी व शिक्षकांना शिक्षणतज्ज्ञ कमल खेतन यांनी केले. 

संस्थेचे अध्यक्ष  अनंतलाल रतनचंद दोशी यांनी स्व.सौ.सुशिला मां यांना शिक्षणाची प्रचंड आवड होती व लहान मुलांवर त्यांचे अतोनात प्रेम होते.त्यांच्या या प्रेरणेने या रत्नत्रय संकुलाची स्थापना करण्यात आली. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करुन त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देणे हे आपले कर्तव्य आहे.प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपले लक्ष फक्त अभ्यासावर केंद्रीत केले तर यश हमखास मिळतेच असे प्रतिपादन केले.तसेच या कार्यक्रमासाठी राशीन चे युवा उद्योजक समीर दोशी,

  संस्थेचे मार्गदर्शक अजितकुमार‌ दोशी,  सदाशिवनगर चे सरपंच विरकुमार दोशी, सचिव प्रमोद दोशी, मार्गदर्शक अजितकुमार‌ दोशी, वैभव शहा, वसंत ढगे, रामदास कर्णे, दत्ता भोसले, ज्ञानेश्वर राऊत , वैभव मोडासे, रुपनवर भाऊसाहेब, संस्थेचे सर्व संचालक उपस्थित होते. यावेळी इयत्ता पाचवी स्काॅलरशिप मध्ये प्रथम आलेली कु आरोही प्रदीप हेळकर, इयत्ता आठवी मध्ये प्रथम क्रमांक आलेला शंभुराज किशोर जाधव, इयत्ता दहावी इंग्रजी माध्यम मधुन प्रथम कु. अपूर्वा नवनाथ जाधव, द्वितीय कु. धनश्री मनोज नाळे, तृतीय कु.श्वेता नानासो नारणवर,  सेमी इंग्रजी माध्यम मधुन चिं.शिवम बालासाहेब रेटरे द्वितीय चिं.रविराज विष्णू काळे तृतीय चिं.समीक्षा दत्तात्रय शिंदे.इयत्ता बारावी मधुन प्रथम कु. कोमल पोपट वाघमोडे, द्वितीय  कु.स्नेहा आनंदराव ढोबळे, तृतीय कु.पूर्वा संदीप शिंदे तसेच महावीर निर्वाणकल्याणक महोत्सव राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत ५वी ते ७वी गटातुन कु. श्रेया नितीन राऊत, ८वी ते १०वी गटामध्ये प्रथम कु.आर्या मनोज दोशी, तृतीय कु. धनश्री मनोज नाळे तसेच या निबंध स्पर्धेसाठी मार्गदर्शन शिक्षिका सौ.सविता देसाई  या सर्वांचा या वेळी सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी संस्थेचे मुख्याध्यापक दैवत वाघमोडे,  दहिगाव आय टी आय चे प्राचार्य गजेश जगताप,  रत्नत्रय अकॅडमी चे मुख्याध्यापक सतिश हांगे  उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमृता मोहीते  व आभारप्रदर्शन भक्ती गोरे  यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या