अजित दादांना माळेगावच्या चेअरमन पदाचे डोहाळे का लागले....! संघटने कडून एपींचा खरपूस समाचार.!
वृत्त एकसत्ता न्यूज
(जयपूर, राजस्थान येथून)
जयपूर, राजस्थान प्रतिनिधी दिनांक 16/6/2025 :
"महाराष्ट्र राज्यातील बारामती तालुक्यात असलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे निवडणुकीचे बिगुल वाजले असून साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी चक्क महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार यांनी उमेदवारी अर्ज भरून जनमानसात स्वतःची प्रतिमा स्वतःच खराब करून घेतल्याचा आरोप जनतेतून होत आहे. या प्रसंगी शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटना महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष हे जयपूर राजस्थान येथे शेतकरी संवाद यात्रा दरम्यान मोर्चा निमित्त आले असता जयपूर येथे पत्रकारांशी बोलत होते.
"राष्ट्रीय किसान संवाद यात्रा निमित्त जयपुर, येथे आले असता ते दुर्गापूर येथे पत्रकारांशी ते बोलत होते. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संदर्भामध्ये साखर कारखान्याच्या संचालक पदासाठीची निवडणूक लढवत असल्या संदर्भात पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले की महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना एका छोट्या सहकारी संस्थेचे चेअरमन पदाचे डोहाळे का.! लागले? हा अत्यंत महत्त्वाचा आणि संशोधनाचा विषय आहे. महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री पदी सात आठ वेळा आणि राज्याच्या मंत्रीपदात गेली ३५ वर्षे सतत कार्यरत असलेले आणि खाजगी साखर कारखाना क्षेत्रामध्ये आर्थिक प्राबल्य असलेली व्यक्ती सहकार क्षेत्रामध्ये चुकीच्या पद्धतीने प्रवेश करत असल्याचा आरोप विठ्ठल राजे पवार यांनी या पत्रकार परिषदेमध्ये केला आहे.
यावेळी पुढे बोलताना विठ्ठल राजे पवार यांनी एक जुनी परंतु महत्वाची हकीकत सांगताना म्हटले की १०९१ ला मी स्वतः महाराष्ट्र राज्याच्या बांधकाम तसेच महापालिका सार्वजनिक कार्य क्षेत्रात शासकीय नोंदणी, (रजिस्ट्रेशन) प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा क्लास वन मध्ये नोंदणी असलेला एक उद्योजक म्हणून कार्यरत होतो. "त्यावेळी मी पहिल्यांदा श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरला असता, मला निवडणुकीपासून परावृत्त करण्याच्या हेतूने अजित पवार यांच्या पिलावळीने मज्जाव केला. तत्कालीन आमदार गणपत पाटील यांनी दुसऱ्या एकाची शिफारस केली होती त्यामुळे, मी पहिल्यापासूनच स्वकष्टाने आलिशान जिंदगी जगणाऱ्या माझ्यासारख्या व्यक्तीला आणि सहकारी किंवा खाजगी साखर कारखाने मध्ये, कारखान्याच्या इंजिनिअरिंग क्षेत्रातली महत्त्वपूर्ण माहिती असलेला कार्यकर्ता म्हणून माझी दखल अनेकांनी घेतली होती, परंतु एखादी हुशार व्यक्ती नको म्हणून माझे टिकीट कट करायचे, असं त्यांच्या पिलावळीकडून ठरलेलं होतं, म्हणून त्यांनी मला बरीच शोधाशोध केल्याच्या नंतर आमचे कसबा बारामती दूध संघा शेजारी असलेल्या माझ्या बहिणीच्या निवासस्थानी मी राहत होतो, कसबा बारामती दूध संघामध्ये माझे उमेदवारीवरून बराच खोलवर चर्चा झाली होती. त्यावेळी अजित पवार हे राज्यमंत्री होते, बारामती कसबा दूध संघामध्ये झालेल्या बैठकीमध्ये राजेंद्र पवार मी अजित दादा पवार किरण गुजर आणि एका कोपऱ्यात पृथ्वीराज जाचक हे अक्षरक्षा स्टुलवर बसलेले होते. त्यावेळी अजित पवार यांनी मला म्हटले होते की सहकारी साखर कारखान्यांमध्ये ठेकेदारांना संचालक करून सहकारी संस्थांचे खाजगीकरण करायचे नाही,? तर मी त्यांना स्पष्ट पणे सांगितलं होतं की मी स्वतः वैयक्तिक उद्योजक आहे., मि व्यापारी नाही त्यावर बराच खल झाल्यानंतर अजित पवार यांनी मला म्हटले विठ्ठलराव मि तुम्हांला पुढच्या पंचवार्षिक (१९९६) मध्ये संधी देऊ. अशा संदर्भात आमची चर्चा झाल्यानंतर त्यांनी माझी, खोटी समजूत काढली होती हे १९९६ ला सिद्ध झाले. मात्र त्याच वेळेनंतर मी अजित पवार या बिन भरोष्याच्या नेत्यावर आपला विश्वास नसल्याचे जाहीर बोलून दाखवले होते, आणि तसे मी जाहीर करून तेव्हापासून मी अजित पवार यांचेकडे कोणत्याही वैयक्तिक कामासाठी कधीही मागणी केलेला नाही, सन १०९१ नंतर आपण संबंधितांवर कधीही विश्वास ठेवलेला नव्हता कारण ते विश्वास ठेवण्यास पात्र व योग्यतेचे नाहीत असे परखड बोलून विठ्ठल राजे पुढे ते म्हणाले की महाराष्ट्राचे पुणे जिल्ह्यातील बारामती तालुका येथील माळेगाव सहकारी साखर कारखाना हा सर्वसामान्य सभासदांचा शेतकऱ्यांचा साखर सहकारी साखर कारखाना आहे त्यामध्ये खाजगी साखर कारखानदारीमध्ये प्रचंड प्राबल्य असलेली व्यक्ती चेअरमन कधी राहणे किंवा निवडणूक लढवणे आणि त्यानंतर चेअरमन पदी राहणे म्हणजे सहकार क्षेत्राला मोठा धक्का किंवा नुकसान पोहोचवण्याचे हेतू आहे असे सिद्ध होते. खाजगी साखर कारखानदारी मध्ये मोठे प्राबल्य असलेली व्यक्ती करू शकते किंवा त्या कारखान्याच्या चेअरमन पदी राहून त्यांना राज्य साखर संघाचे अध्यक्ष व्हायचे आहे का.? किंवा दिल्लीच्या सहकारी साखर कारखानदार युनियनचे अध्यक्ष व्हायचे आहे की.? नेमकं त्यांच्या डोक्यात कोणते टार्गेट आहे, त्यांनी बारामती येथील माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन पदासाठी उमेदवारी अर्ज का भरला हा एक संशोधनाचा विषय आहे. त्यामुळे या संदर्भात त्यांनाच विचारलेलं बरं असं म्हणत अजित पवार यांना चांगलेच फटकारले आहे .
" तुम्ही कारखान्याच्या प्रचारामध्ये सक्रिय होणार का असे विचारले असता राजे म्हणाले की मला तीन-चार जणांचे फोन आलेले आहेत, परंतु मी "राष्ट्रीय किसान संवाद यात्रेमध्ये व्यस्त असल्यामुळे त्यांनी बोलावलेल्या वेळेत मी त्यांना उपलब्ध होऊ शकणार नाही असे कळवले होते, परंतु आज मी मध्य प्रदेश गुजरात राजस्थान हरियाणा च्या दौऱ्यावरून परत पुण्याला निघालेलो आहे. मी एका राष्ट्रीय शेतकरी संघटनेचा प्रमुख आहे. आणि शेतकऱ्यांच्या संस्था वाचवण्यासाठी महाराष्ट्र राज्यामध्ये माझ्या नेतृत्वाखाली, "शेतकरी कष्टकरी कामगार सहकार बचाव आंदोलनाच्या" माध्यमातून गेली २४-२५ वर्षे कार्यरत आहे. माझ्या नेतृत्वात मी सहकारी साखर कारखान्यांचे उस किंमती वर केंद्र सरकारचे इन्कम टॅक्स विभागाने बेकायदेशीरपणे लागलेल्या २५ हजार कोटीच्या इन्कम ट्रॅक्स वसुलीला (स्टे ऑफ डिमांड इन को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरी रजि. महाराष्ट्र राज्य.) अशा स्पष्ट शब्दात बुद्ध इन्कम टॅक्स खाली मुंबई उच्च न्यायालयाचा स्थगिती आदेश मिळवलेला आहे, आणि तो आदेश माझ्या कायम आहे, संघटनेचे आणि माझ्या नावे बाय नेम आदेशित आहे. त्यावेळीच अजित पवार यांना या गोष्टीचा गंधही नसेल, आणि नाही. सहकार क्षेत्रामध्ये काय काम असतं याची मला जाणीव आहे आणि मला या संदर्भात जर अपोझिशन पॅनलच्या प्रमुखांनी निमंत्रित केल्यास मी निश्चितपणे शेतकऱ्यांच्या हितासाठी बारामती माळेगाव कारखान्याच्या प्रचारासाठी वेळ देऊ शकेल असे जाहीर करत बारामती तालुक्यातील माळेगाव साखर कारखान्याच्या सभासदांनी अजित पवार यांचा पराभव करावा असे जाहीर आवाहन केले, यावेळी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष भाग्यवंत ल. नायकुडे, राजस्थानचे प्रदेशाध्यक्ष राजपाल मीना, राजस्थानचे प्रसिद्धी प्रमुख सुखलाल टाटू मीना उपस्थित होते.



0 टिप्पण्या