"मागण्या मान्य झाल्या नाही तर नामदार बच्चू भाऊंच्या नेतृत्वाखाली राज्यभर तीव्र आंदोलनाचा इशारा.

"मागण्या मान्य झाल्या नाही तर नामदार बच्चू भाऊंच्या नेतृत्वाखाली राज्यभर तीव्र आंदोलनाचा इशारा.

वृत्त एकसत्ता न्यूज

आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई.

 दिनांक 28/06/2025 :

"महाराष्ट्र राज्य सरकारने अनेक आंदोलनामध्ये अनेक आश्वासन दिली मात्र ती आश्वासने राज्य सरकारने पूर्ण केलेली नाहीत. हा अनुभव लक्षात घेता दोन जुलै रोजी होणाऱ्या बैठकीमध्ये सुमारे अठरा विषयांवरील मागण्यांच्या संदर्भात काही मागण्या मंजूर झालेले आहेत तर उर्वरित मागण्यांच्या संदर्भात सात विषयांवर मा. नामदार बच्चुभाऊ कडू यांच्यासह महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत सर्व संबंधित खात्याचे मंत्री वरिष्ठ मुख्य अधिकारी सचिव यांच्यात सुमारे 4/5 तास बैठक होणार आहे. 

या बैठकीत शेतकरी कर्जमुक्तीसह दुध व ऊस  शेतमालाला एम एस पी+२०% अनुदान, हमी  भावापेक्षा कमी दराने विक्री झालेल्या शेतमाला भावांतर  योजनेतील फरक दराच्या संदर्भात मागण्या मान्य झाल्या नाहीत तर ऑगस्ट सप्टेंबर 2025 च्या दरम्यान राज्यात तीव्र स्वरूपाचे  शेतकरी संप आंदोलन मा. नामदार बच्चुभाऊ कडू यांच्या नेतृत्वात २०० हून अधिक संघटना सहभागी होतील आणि तीव्र स्वरूपाचे आंदोलन केलं जाईल, त्यामध्ये सर्व प्रकारचा शेतमाल विक्री बंद पासून  शेतकरी संप करत राज्य सरकारला धारेवर धरण्यात येणार असल्याचा इशारा  आंदोलनाचे निमंत्रक विठ्ठल राजे पवार( राष्ट्रीय अध्यक्ष शरद जोशी विचार मंच शेतकरी संघटना महासंघ) यांनी प्रसिद्धी पत्रका द्वारे दिलेला आहे अशी माहिती महासंघाचे महाराष्ट्र राज्य संपर्क व प्रसिद्धीप्रमुख भाग्यवंत ल. नायकुडे यांनी सांगितली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या