🔰 साधूसंत येती घरा
तोची दिवाळी दसरा
🟠 ज्या गावात पालखी सोहळा असतो तेथे प्रती पंढरपूर
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई.
दिनांक 22/06/2025 :
संतांनी म्हटल्या प्रमाणे साधूसंत येती घरा तोची दिवाळी दसरा या उक्तीप्रमाणे दरवर्षी आषाढी वारी सुरू झाली की अवघे मराठी मन भक्तीमय होऊन जाते वारकरी संप्रदाय मध्ये सर्व मानवता धर्म सामावलेला पहायला मिळतो वारी मध्ये जात धर्म पंथ विसरुन एकच रंग पहायला अनुभवायला मिळतो तो म्हणजे पांडुरंग अखंड विश्वाला रहस्यमय वाटावा असा वारीचा नयनरम्य सोहळा असतो सारं कसं शिस्तप्रिय लोकप्रिय आनंदमय सुखमय वातावरण असते एका शिस्तीत सारे काही आखीव रेखीव वेळापत्रक नुसार वारी सुरू असते या वारीचे आकर्षण म्हणजे बहुजन गिरीजन अभिजन अठरापगड समाज सहभागी असतो जागोजागी अन्नदान पाणपोई फळे वाटप फराळ वाटप तसेच अंध दिव्यांगाना त्यांच्या गरजेनुसार सोयीनुसार साहित्य वाटप केले जाते हरिनामाचा गजर भजन कीर्तन प्रवचन करत अवघं विश्व व्यापून टाकण्याचा एकमेव सोहळा म्हणजे आषाढी वारी म्हणता येईल सर्वात आनंदाचा क्षण सोहळा म्हणजे आषाढी वारीला पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनासाठी निघालेल्या पालख्यांचा ज्या गावात मुक्काम असतो त्या गावात प्रती पंढरपूर अवतरते हा स्वर्गीय सुखाचा आनंद भक्तीची पर्वणी याचे काय वर्णन करावे
*विठ्ठल विठ्ठल गजरी*
*अवघी दुमदुमली पंढरी*
असे भक्तीमय वातावरण निर्माण झालेले असते महाराष्ट्राचे आराध्य दैवत पंढरपूरचा विठ्ठल हा लोकदेव आहे थकल्या भागलेला श्रमिक कष्टकरी शेतकरी यांचे दैवत तर आहेच परंतु दिन दुबळ्या अनाथांचा तो मायबाप आहे त्यामुळे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज संत मुक्ताई जनाबाई चोखामेळा नामदेव व हजारोंच्या संख्येने येणाऱ्या लहान मोठी दिंडी पालखी पंढरपूरच्या दिशेने निघाल्या आहेत त्यामुळे हा भक्तीमय सोहळा आणि त्यात या वर्षी वरुणराजा सर्वत्र वेळेवर बरसला आहे त्यामुळे शेतकरी सुखावला आहे नद्या नाले ओढे खळाळून वहात आहेत सगळीकडे निसर्ग हिरवागार नटलेला पहायला मिळत आहे ही सर्व पांडुरंगाची कृपा आहे आषाढी वारी ही म्हणजे
विठु माझा लेकुरवाळा
संगे गोपाळांचा मेळा
काय सुंदर वर्णन संतांनी केले आहे अवघा महाराष्ट्र या वारीमुळे भक्ती रसात न्हाऊन निघाला आहे.
बी. टी. शिवशरण
श्रीपूर

0 टिप्पण्या