🟪 "निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली म्हणजे योग होय"- अनंतलाल दोशी

🟪 "निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली म्हणजे योग होय"- अनंतलाल दोशी

वृत्त एकसत्ता न्यूज

आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई.

 दिनांक 26/06/2025 :

"निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली म्हणजे योग होय" असे मत अनंतलाल  दोशी यांनी व्यक्त केले. रत्नत्रय इंग्लिश मिडीयम व कनिष्ठ महाविद्यालय मांडवे येथे "आंतरराष्ट्रीय योग दिन" मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी योग प्रात्यक्षिक मध्ये सहभाग घेतला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष अनंतलाल दादा दोशी हे मार्गदर्शन पर बोलत होते. 

ते पुढे असेही म्हणाले की, योग हा शरीराला बळकट करतो. मन शांत करतो. दैनंदीन जागरूकता वाढवतो. निरोगी शरीर व मन प्रसन्न ठेवण्यासाठी दररोज योगासने केली पाहिजे. शारिरिक व्याधींबरोबर मानसिक विकारांवर सुध्दा विजय मिळवता येतो. आजकालच्या धकाधकीच्या जीवनशैलीत मनःशांती टिकवून ठेवण्याचा सोपा उपाय म्हणजे योग. दर दिवशी नियमित योगाभ्यास केल्यास शारीरिक व मानसिक विकारांवर व विजय मिळवता येतो. असे सांगून योगातुन बौध्दिक पातळी सुधारते आणि आपल्या भावना स्थिर ठेवून एकाग्र होवु शकतो असे प्रतिपादन केले. यावेळी संस्थेचे मुख्याध्यापक दैवत वाघमोडे, उपमुख्याध्यापिका सविता देसाई,  पर्यवेक्षक कलिम पठाण  व सर्व शिक्षक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या