सहकार महर्षि अभियांत्रिकी महाविद्यालया मध्ये छत्रपती राजर्षी शाहु महाराज यांची जयंती संपन्न

 

सहकार महर्षि अभियांत्रिकी महाविद्यालया मध्ये छत्रपती राजर्षी शाहु महाराज यांची जयंती  संपन्न

वृत्त एकसत्ता न्यूज

आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई.

दिनांक 26/06/2025 : सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च शंकरनगर, अकलूज (तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर) या अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये छत्रपती राजर्षी शाहु महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.  यावेळी महाविद्यालयाचे समन्वयक, सर्व विभागाचे विभाग प्रमुख, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. 

महाविद्यालयाचे कॉम्प्यूटर विभागाचे विभाग प्रमुख प्रा. सचिन पांढरे यांचे हस्ते छत्रपती राजर्षी शाहु महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कॉम्प्यूटर विभागाचे प्रा. इंद्रजीत इनामदार यांनी  छत्रपती राजर्षी शाहु महाराज यांच्या विषयी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले कि राजर्षी शाहु महाराज हे एक महान समाजसुधारक आणि प्रगतीशील राजे होते, ज्यांनी शिक्षण, सामाजिक न्याय आणि बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी महत्वपूर्ण कार्य केले.

सदर कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी समन्वयक व सूत्रसंचालन म्हणून  प्रा. भारती चंदनकर व शैलेंद्र फुले यांनी काम पाहीले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या