सहकार महर्षि अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन संपन्न

 

सहकार महर्षि अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन संपन्न

वृत्त एकसत्ता न्यूज

आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई.

दिनांक 21/06/2025 :

 सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च, शंकरनगर - अकलूज या अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये २१ जून २०२५ रोजी ११ व्या आंतरराष्ट्रीय योग संगम दिनाचे  आयोजन महाविद्यालय विकास समितीच्या अध्यक्षा कु. स्वरूपाराणी जयसिंह मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण ढवळे यांनी दिली.  शिक्षकांच्या व विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी योगाचे फायदे  सर्वांपर्यंत पोहोचवणे, निरोगी जीवनशैलीचा प्रचार करणे आणि भारताच्या प्राचीन परंपरेचे महत्व जागतिक स्तरावर अधोरेखित करणे या उद्देशाने योग संगम दिनाचे  आयोजन केलेले होते . त्यामध्ये शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला.

या योग कार्यशाळेमध्ये योगा अभ्यासिका  सौ. वैशाली शिंदे-साळुंखे  यांचे मार्गदर्शन लाभले. सदर योग कार्यशाळा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी  कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून  महाविद्यालय समन्वयक पोपट भोसले-पाटील व शैलेंद्र फुले यांनी काम पाहिले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या