गृहविज्ञान महिला महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

 

गृहविज्ञान महिला महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

वृत्त एकसत्ता न्यूज

आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई.

दिनांक 23/06/2025 :

 सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथील श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील गृहविज्ञान महिला महाविद्यालयात  दिनांक 21 जून 2025 रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन  महाविद्यालयातील सर्व विद्यार्थिनी व कर्मचाऱ्यांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करुन साजरा करण्यात आला. यामध्ये विद्यार्थ्यांसाठी 'योग व त्याचे महत्त्व' याविषयी मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते . तसेच विद्यार्थिनींसाठी विविध योगासनांचे सादरीकरण करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून बी बॅलेन्स फिटनेस क्लबच्या संचालिका निशा इंगळे या उपस्थित होत्या.  सौ. इंगळे यांनी विद्यार्थिनींना योग साधना व आहाराचे शारीरिक आरोग्यातील महत्त्व व आपल्या तंदुरुस्तीवर होणारा परिणाम याविषयी मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थिनींना त्यांच्या व्याख्यानातून  दैनंदिन योगसाधना करण्यासाठी प्रोत्साहन दिले . तसेच विद्यार्थिनींसाठी विविध प्रकारच्या योगासनांचे प्रकार प्रात्यक्षिकाद्वारे सादर केले . विद्यार्थिनींनी  उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून विविध प्रकारची योगासने सादर केली. महाविद्यालय विकास समितीच्या अध्यक्षा कु. स्वरूपाराणी मोहिते पाटील यांचे मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या दिनानिमित्ताने महाविद्यालयातील प्राध्यापक व कार्यालयीन कर्मचारी यांनीही उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ .भारती भोसले  तसेच आभार प्रदर्शन प्रा.अरविंद वाघमोडे यांनी  केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. राहुल सुर्वे, डॉ. ऋषी गजभिये, डॉ. जयशीला मनोहर, डॉ. छाया भिसे, डॉ. राजश्री निंभोरकर,  विजय कोळी, दीपक शिंदे, रमजान शेख व विद्यार्थिनी यांनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या