टेंभुर्णी येथे 23 जून रोजी मे. त्रिमूर्ती ट्रॅक्टर्स उद्घाटन समारंभ सोहळा

 

टेंभुर्णी येथे 23 जून रोजी  मे. त्रिमूर्ती ट्रॅक्टर्स उद्घाटन समारंभ सोहळा

वृत्त एकसत्ता न्यूज

आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई.

 दिनांक 22/06/2025 :

न्यू हॉलंड ट्रॅक्टर चे माढा, माळशिरस आणि करमाळा तालुक्याचे अधिकृत विक्रेते "मे. त्रिमूर्ती ट्रॅक्टर्स" या भव्य ट्रॅक्टर विक्री दालनाचा उद्घाटन समारंभ सोहळा सोमवार दिनांक 23 जून 2025 रोजी दुपारी 1 वा. या शुभमुहूर्तावर संपन्न होणार आहे. करमाळा तालुक्याचे माजी आमदार संजय (मामा) शिंदे आणि पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे व माढा तालुक्याचे युवा नेते विक्रमसिंह शिंदे या मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.

या उद्घाटन समारंभ सोहळ्यासाठी गजानन हुजरे (सी.बी.यु. मॅनेजर महा., परेश प्रधान (रिजनल मॅनेजर महा), मंगेश डहाके (डीलर डेव्हलपमेंट महा.), गणेश निंबोरे (क्लस्टर हेड महा.), स्वप्नील राऊत (टेरिटोरी मॅनेजर) प्रशांत बावनकर (सर्विस इंजिनियर), युवा उद्योजक रावसाहेब (नाना), देशमुख सुधीर, (बापू) महाडिक (संस्थापक जाणता राजा मित्र मंडळ), सामाजिक कार्यकर्ते शिवाजीराव येवले - पाटील, शिवसेना नेते संजय (बाबा) कोकाटे इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम अकलूज चौक, कोटक बँक शेजारी, अकलूज रोड टेंभुर्णी, तालुका माढा या ठिकाणी होणार असल्याची माहिती निमंत्रक प्रदीप (मामा) जगदाळे, पोपटराव चव्हाण, सचिन आरडे यांनी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या