🔰 इंजिनिअरचे अजब डोके
🔹18 कोटींचा खर्च, 8 वर्षाची प्रतिक्षा अन् बांधला अद्भूत नमुना; 90 अंशाचं वळण असलेल्या पूलप्रकरणी 8 अभियंते निलंबित!
वृत्त एकसत्ता न्यूज / माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव
आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई.
दिनांक 28/06/2025 :
मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमधील एका पुलाची सध्या देशभरात जोरदार चर्चा सुरू आहे. ऐशबाग मैदानाजवळील हा रेल्वे ओव्हरब्रिज अद्याप सुरू झालेला नसला तरी त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून सरकारमधील नमुन्यांवर टीकेची झोड उठली. तब्बल 8 वर्षाच्या प्रतिक्षेनंतर तयार होत असलेल्या या पुलावर 18 कोटी खर्च करण्यात आले. मात्र पुलावरील मृत्युला आमंत्रण देणारे 90 अंशांचे वळण पाहून सर्वांनाच धक्का बसला. नेटकऱ्यांसह विरोधकांनीही या मुद्दा रेटून धरल्याने सरकारला जाग आली. या प्रकरणी कठोर कारवाई करत सरकारने 8 अभियंत्यांना निलंबित केले आहे.
ऐशबाग रेल्वे ओव्हरब्रिजच्या निर्माणात गंभीर चुका झाल्याची दखल घेत चौकशीचे आदेश दिले. चौकशी अहवालाच्या आधारे पीडब्ल्यूडीच्या 8 अभियंत्यांवर कारवाई करण्यात आली आहे. दोन मुख्य अभियंत्यांसह 7 अभियंत्यांना तात्काळ निलंबित करण्यात आले असून एका मुख्य अभियंत्याची विभागीय चौकशी केली जाईल, अशी माहिती मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी एक्सवर दिली.
या प्रकल्पामध्ये रेल्वे ओव्हरब्रिजचे सदोष डिझाईन सादर केल्याप्रकरणी बांधकाम एजन्सी आणि डिझाईन सल्लागार यांना काळ्या यादीत टाकण्यात आल्याचेही मोहन यादव यांनी सांगितले. तसेच रेल्वे ओव्हरब्रिजमध्ये आवश्यक सुधारणा करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली असून सुधारणेनंतरच ब्रिजचे उदघाटन केले जाईल, अशी माहितीही त्यांनी दिली.
ऐशबाग आरओबी के निर्माण में हुई गंभीर लापरवाही में मैंने संज्ञान लेते हुए जाँच के आदेश दिये थे। जाँच रिपोर्ट के आधार पर लो.नि.वि. के 8 इंजीनियर्स के खिलाफ कार्रवाई की गई है। दो सीई सहित सात इंजीनियर्स को तत्काल प्रभाव से निलंबित किया गया है। एक सेवानिवृत एसई के खिलाफ विभागीय जाँच…
— Dr Mohan Yadav (@DrMohanYadav51) June 28, 2025
नेमकं प्रकरण काय?
भोपाळमधील ऐशबाग मैदानाजवळ एक नवीन रेल्वे ओव्हरब्रिजचे काम गेल्या काही काळापासून सुरू आहे. तब्बल 8 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर हा ब्रिज पूर्णत्वास येत होता. मात्र हा ब्रिज धोकादायक वळणामुळे चर्चेत आला. 90 अंशाच्या वळणामुळे भविष्यात ब्रिजवर जीवघेणे अपघात होण्याची भीती व्यक्त करण्यात आली. ब्रिजच्या डिझाईनवर अनेकांनी सवाल उपस्थित केला. 18 कोटी खर्च करून हा अद्भूत नमुना बांधणाऱ्या अभियंत्यांवर कारवाईची मागणी होऊ लागली. याची दखल अखेर मध्य प्रदेशमधील भाजप सरकारला घ्यावी लागली आणि चौकशीनंतर अभियंत्यांवर कारवाई करण्यात आली.
0 टिप्पण्या