श्रीमती सोनी प्रभाकर कानडे यांचा राज्यस्तरीय नारीशक्ति पुरस्काराने सन्मान.

 

श्रीमती सोनी प्रभाकर कानडे यांचा राज्यस्तरीय नारीशक्ति पुरस्काराने सन्मान. 

वृत्त एक सत्ता न्यूज

माळशिरस /सुजाता गोखले 

दिनांक6/5/2025 : 

माळशिरस तालुक्यातील जि. प .प्राथमिक आदर्श कन्या शाळा माळशिरस शाळेतील शिक्षिका  सोनी प्रभाकर कानडे यांना स्टेट इनोव्हेशन अँड रिसर्च फाउंडेशनच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय नारीशक्ती पुरस्कार सोलापूर येथे  प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  शिक्षणाधिकारी कादर शेख, प्रिसिजन अध्यक्षा सुलोचना शहा तर   सामाजिक कार्यकर्त्या  डॉ. सुजाता लोहोकरे, प्रशासन अधिकार डॉ. शशिकांत शिंदे,  फाउंडेशनचे राज्यसमन्वयक सिद्धाराम माशाळे, सौ.हेमा वाघ, बाळासाहेब वाघ, सौ . अनघा जहागीरदार व व सर्व  फाऊंडेशन  टीम यांची उपस्थिती होती. शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल कानडे यांचा हा गौरव करण्यात आला.

या गौरवाबद्दल त्यांचे माळशिरसच्या गटशिक्षणाधिकारी सौ.सुषमा महामुनी  विस्ताराधिकारी सौ.उज्वला नाकाते , सर्व केंद्रप्रमुख , शाळा व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापिका सौ सुवर्णा गोरे , सर्व शिक्षक वृंद व पालकांनी अभिनंदन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या