मुलींच्या आयाच नालायक...

 मुलींच्या आयाच नालायक...

(केवळ शीर्षक वाचुन कॉमेंट नको.) 

वृत्त एकसत्ता न्यूज

संकलन :  भाग्यवंत ल. नायकुडे,

 अकलूज दिनांक 18/05/2025 :

अलीकडच्या मुलींच्या अंगप्रदर्शन करणाऱ्या पेहरावाबाबत Paridnya Bhimashankar Puri यांचा एक लेख वाचला. सदर लेख त्यांनी रेड २ बघितल्यानंतर लिहिला असल्याचे म्हटले आहे. रेड २ कशाला? अंग प्रदर्शन, लिप कीस आणि आता उघड उघड फ्रेंच किस दाखवणारे सीन सिनेमात उघडपणे दिसत असतात. खरं तर सेन्सॉर अशा दृश्यांना कात्री लावू शकते. परंतु सिनेमे समाज नासविण्यासाठी बनवले जातात. समाजात जे जे काही वाईट दिसत असेल त्याचं मूळ सिनेमात आहे. 

खरंतर मुलींना अंगप्रदर्शन करणारे, मांड्या, काखा दर्शन करणारे कपडे वापरायला प्रत्येक आई मज्जाव करू शकते. पण नाही. अलीकडे वयाच्या साठीत देखील मी कशी तिशीची दिसते हे दाखवण्याचा अट्टाहास सुरू असतो. त्यासाठी अगदी साठीच्या स्त्रिया देखील सर्रास वन पीस, जीन्स घालताना दिसतात. असे कपडे घातले म्हणजे आपण फार सुधारित असे वाटायला लागते. 

मुस्लिम तरुणी हिजाबसाठी आग्रही आहेत. आणि आमच्या तरुणींना ओढणी नकोशी झाली आहे. शॉर्ट टॉप, तंग टी यात स्तनांचे उंचवटे उठून दिसतातच. त्यात पुन्हा त्या टी शर्टवर असे काही लिहिलेले असते की बघणाऱ्या व्यक्तीची नजर तिथे गेलीच पाहिजे. 

खरंतर मुलींच्या आया मुलींना असे कपडे वापरण्यासाठी मुलींना मज्जाव करू शकतात. परंतु मुलींच्या आयाच नालायक आहेत. मोठी झाल्यावर, लग्न झाल्यावर माझ्या मुलीला असे कपडे कोणी वापरू देणार नाही म्हणत  अडकाठी करण्याऐवजी आयाच मुलींना प्रोत्साहन देत असतात.

बापाला हे फारसे आवडत नसते. कोणत्या बापाला आपल्या मुलीच्या छातीचा उत्तानपणा उठून दिसल्याचे आवडेल? परंतु बापाची विरोध करण्याची हिंमत नसते. कारण तसे केले तर बायको रुसून बसण्याची आणि रात्री अगदी स्वतंत्र बिछाना टाकून नव्हे पण कमीत कमी अबोला धरण्याची, पाठ फिरवून झोपण्याची शक्यता असतेच असते. 

"हम नहीं बदलेंगे, तुम्हारी नजर बदलो", "अंगप्रदर्शन करणारी प्रत्येक स्त्री बाहेरख्याली नसते", "दोष बघणाऱ्याच्या नजरेत असतो." हे बोलायला खुप सोपे आहे. आणि नजरेचे काय घेऊन बसलात. अलीकडच्या तरुणांना हे अगदी लहानपणापासून दिसत असल्यामुळे त्यांची नजर मेली आहे. आणि त्यांच्यातलं उद्दीपन खालावलं आहे असं माझं मत आहे. उद्दीपन खालावलं आहे म्हणजे मुलांची सेक्स करण्याची क्षमता नाहीशी झाली आहे असं मला अजिबात म्हणायचं नाही. परंतु त्यातला रोमान्स, त्यातलं आकर्षण कमी झालं असावं असं वाटतं. 

परंतु लिहिणे आणि बघ्याची भुमिका घेणे यापेक्षा अधिक काही करता येण्यासारखे उरलेले नाही. कारण तिशीच्या तरुणीला मी कशी टीनेजर कॉलेज तरूणी दिसते हे दाखवण्यात अधिक रस असतो. तर पन्नाशी उलटलेल्या प्रौढ स्त्रियांना मी कशी माझ्या माझ्या सुनेहून तरुण दिसते हे दाखवायचे असते. 

आपल्या बायकोने, मुलीने अशी अंगप्रदर्शन करणारी फॅशन करावी, जीन्स वापरावी, छातीचे उंचवटे ठसठशीत करणारे टीशर्ट वापरावेत असे कोणत्याच बापाला, नवऱ्याला वाटत नसते. परंतु आडकाठी करण्याची हिंमत कोणातही उरलेली नाही. 

बरं हा तरुण दुसऱ्याचा, वय लापवण्याचा, त्यासाठी विवाहित स्त्रीने शाळकरी मुलींची फॅशन करण्याचा, साठीतल्या स्त्रीने वन पीस वापरण्याचा सगळा अट्टाहास स्त्रियांमध्येच बरं का? बहुतांश पुरूष बिचारे हँगरला अडकवलेला शर्ट अडकवून कुठेही निघण्याच्या तयारीत असतात. किंवा फार फार बरे कपडे अंगावर असावेत एवढाच विचार करतात. पण तरूण आणि सुंदर दिसण्याचा स्त्रियांचा अट्टाहास बघितला की अचंबित व्हायला होते. 

अगदी फेसबुकवर सुद्धा अनेक मुलांचे कव्हर फोटो हे तिशी पस्तीशीतील असतात. प्रत्यक्षात अनेकांना सुना, जावई आलेले असतात. अनेकांच्या खांद्यावर एक नातवंडे खेळत असतात. पण डीपी, कव्हर फोटो मात्र तिशीतले. कशासाठी?


विजय शेंडगे, पुणे 

9422356823

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या