🟩 खोल श्वास परिपुर्ण औषध
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलन: आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई.
दिनांक 05/05/2025 : श्वास आयुष्याचा आधार आहे, मन आणि जीवना मधील रहस्यमय दोरी आहे, जिच्या आधारे कोणीही प्राणी आयुष्यात पाऊल ठेवतो. म्हणून शारीरिक संरचनेत श्वासाच्या गतीचे स्थान महत्त्वपूर्ण आहे, कारण श्वासाची गती वाढल्याने शरीराचे तापमान वाढते, त्याला पण वय कमी होण्याचा कारक व अल्पायुचा संकेतांक म्हणू शकतो. धापा टाकणारे जनावर याचा पुरावा आहेत. धापा टाकण्याची गती जेवढी तीव्र असेल, मरण्याची निश्चितता तेवढी वाढेल, हे एक शास्त्रीय तथ्य आहे.
जसे कबूतर एक मिनिटात ३७ वेळा श्वास घेते आणि केवळ ९ वर्ष जिवंत राहते. ससा देखील दर मिनिटाला ३९ वेळा श्वास घेतो आणि त्याचे वय जवळपास ९ वर्ष मानले गेले आहे. कुत्रा १ मिनिटात २९ श्वास घेतो आणि १३ वर्षे जिवंत राहतो. बकरी २४ वेळा, तर हत्ती १ मिनिटात ११ वेळा श्वास घेऊन १०० वर्ष जिवंत राहतो. कासव १ मिनिटात केवळ ४ श्वास घेऊन १५० वर्षांचे दीर्घायुष्य जगतो. मनुष्यासाठी सामान्यतः 'जीवेत् शरद शतम्' ची म्हण प्रचलित आहे. याचा अर्थ आहे की, कधी त्याच्या श्वासांची गती निश्चितच त्यात सरासरीची राहिली असेल, की तो किमान १०० वर्ष जगू शकेल, अर्थात ११ ते १२ श्वास दर प्रति मिनिट.
आज मनुष्याचा श्वास दर वाढल्याने त्याच प्रमाणात त्याचे आयुष्य देखील घटले आहे. सरासरी आयुष्य ६० ते ६५ वर्ष राहिले. अनेक आधुनिक शास्त्रज्ञांचे मानणे आहे की, जर मनुष्याच्या शारीरिक तापमानाला अर्धे केले जाऊ शकले, तर तो सहजपणे १०० वर्षा पर्यंत जगू शकतो, यासाठी त्याला आपल्या श्वासाच्या गतीला साधून त्याच प्रमाणात मर्यादित करावे लागेल. याचा अर्थ आहे मनुष्याच्या श्वासाच्या गतीला प्रति मिनिट २ ते ३ पर्यंत नियंत्रित करणे हे खूप आव्हानात्मक तर आहेच पण अशक्य नाही. प्राचीन काळात ऋषींच्या हजारो वर्षा पर्यंत जिवंत राहण्याच्या तथ्यांवरून सिद्ध होते की, दीर्घायुष्याचे रहस्य मनुष्याच्या श्वासाच्या गती मध्ये लपले आहे. म्हणून आपण आपल्या श्वासाच्या गतीला साधण्यासाठी प्रथम तर श्वास उच्छश्वासाच्या पद्धतीला समजणे आवश्यक आहे. दुसरे आपल्या प्राणाला साधने, त्याचा एक निश्चित दुष्परिणामरहित मार्ग 'प्राणायाम' आहे.
श्वासाच्या दोरीवर मानव जीवन आणि त्याचे आरोग्य टिकलेले आहे. श्वास जेवढा स्थिर, मजबूत असेल जीवन तेवढेच स्वस्थ आणि निरोगी असेल. श्वासात जेवढी जास्त गतिशीलता, तीव्रता येईल आरोग्याच्या शक्यता तेवढ्याच कमी होत जातील, हे शास्त्रीय तथ्य आहे. कारण श्वासाचा सरळ संबंध शरीराच्या तापमानाशी आहे. ज्या तीव्रतेने श्वास गतिशील होईल, त्याच प्रमाणात शरीराच्या तापमानात वाढ होईल. क्रोध, आवेश, उत्तेजनाच्या स्थितीत श्वासाच्या दरात अशा प्रकारची वाढ होते.
खोल श्वास घेण्याचा अर्थ स्पष्ट करताना प्राण विज्ञान विशेष तज्ञ डॉक्टर मेकडॉवल म्हणतात की, प्राणायाम मूळे फुफ्फुसांनाच नाहीतर पोटाच्या संपूर्ण पचनसंस्थेला परिपूर्ण पोषण मिळते. खोल श्वास रक्तशुद्धीसाठी अमूल्य औषध आहे. मनुष्याची कार्यक्षमता वाढवणे, त्यात स्फुर्ती व उल्हास जागवण्यात खोल श्वास घेण्याचा अभ्यास महत्त्वपुर्ण भुमिका निभावतो. म्हणूनच दिर्घायुष्यासाठी दररोज सातत्याने प्राणायाम करणे आवश्यक आहे.
डॉ. प्रमोद ढेरे, पिंपरी-चिंचवड, पुणे
निसर्ग उपचार तज्ञ
संकलन : मिलिंद पंडित, कल्याण
0 टिप्पण्या