🟪 काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदासाठी गिरीश शेटे तर माळशिरस तालुका अध्यक्ष पदासाठी रमेश नामदास इच्छुक
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई, (केदारनाथ, उत्तराखंड येथून)
दिनांक20/5/2025 :
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ची बैठक टेंभुर्णी येथे सोलापूर जिल्हाचे निरीक्षक आमदार मोहन जोशी यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.
यावेळी सोलापूर जिल्हा अध्यक्ष तसेच तालुका अध्यक्ष निवडीचे दृष्टीने निरीक्षक जोशी यांनी करमाळा, माढा आणि माळशिरस तालुक्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांबरोबर सुसंवाद साधला. यावेळी माळशिरस तालुक्यातून गिरीश शेटे यांनी सोलापूर जिल्हाध्यक्षपदी तर माळशिरस तालुकाध्यक्षपदी रमेश नामदास यांनी काम करण्यास तयार असल्याचे सांगितले. सोलापूर जिल्हाध्यक्ष पदासाठी इच्छुक असल्याचे रीतसर पत्र गिरीश शेटे यांनी निरीक्षक जोशी यांच्याकडे यावेळी सुपूर्द केले. यावेळी सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब मगर, दादा नायकुडे, धनाजी मस्के, यशराज शेटे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

0 टिप्पण्या