माजी मुख्याध्यापक बबनराव एकनाथ वजाळे गुरुजी यांचे वार्धक्याने निधन
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 01/05/2025 :
श्रीपूर (तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर) येथील आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ समाजसेवक, माजी उपमुख्याध्यापक बबनराव एकनाथ वजाळे गुरुजी ( वय 90 वर्षे) यांचे बुधवार दिनांक 30 एप्रिल 2025 रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास वार्धक्याने निधन झाले. त्यांचे पश्चात पत्नी, 7 मुले,1 मुलगी, सुना, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे केंद्रीय मुख्याध्यापक म्हणून वजाळे गुरुजी यांनी 32 वर्षे सेवा बजावली. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून श्रीपूर आणि परिसरात शोककळा पसरली आहे.

0 टिप्पण्या