गर्भाचे भाव विश्व अर्थात वैज्ञानिक गर्भसंस्कार कार्यक्रमाचे मोफत आयोजन

 

गर्भाचे भाव विश्व अर्थात वैज्ञानिक गर्भसंस्कार कार्यक्रमाचे मोफत आयोजन 

वृत्त एकसत्ता न्यूज

आकाश भाग्यवंत नायकुडे

मुंबई दिनांक 05/04/2025 : रोटरी क्लब ऑफ अकलूज आयोजित मनशक्ती सेवा विज्ञान केंद्र अकलूज प्रस्तुत सुदृढ सतेज सुसंस्कारी पिढीसाठी अभिनव विनामूल्य कार्यक्रम गर्भाचे भावविश्व अर्थात वैज्ञानिक गर्भसंस्कार कार्यक्रमाचे मोफत आयोजन करण्यात आले आहे. 

रविवार दिनांक 6 एप्रिल 2025 रोजी सकाळी 9 :30 ते 10:15 या वेळेत स्मृती भवन शंकरनगर येथे या कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा प्रमुख पाहुणे डॉक्टर सुरेश साबू (जिल्हा प्रांतपाल डिस्ट्रिक्ट 31 12), तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रियांका शिंदे, अकलूज स्त्रीरोग तज्ञ संघटनेच्या अध्यक्षा डॉक्टर रेवती राणे, गितेश कुलकर्णी (संशोधन विभाग मनशक्ती केंद्र लोणावळा), सुहास गुधाटे ( जीवनदानी साधक, मनशक्ती केंद्र, लोणावळा) यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न होणार आहे अशी माहिती रोटरी क्लब ऑफ अकलूज आणि मनशक्ती सेवा विज्ञान केंद्र अकलूज यांच्यावतीने सांगण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या