🟩 ग्रीनफिंगर्स आयुर्वेदिक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर मध्ये सर्व रोगनिदान शिबिर संपन्न

 

🟩 ग्रीनफिंगर्स आयुर्वेदिक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर मध्ये  सर्व रोगनिदान शिबिर संपन्न 

वृत्त एकसत्ता न्यूज

आकाश भाग्यवंत नायकुडे

मुंबई दिनांक 28/04/2025 : श्री शिवपार्वती सार्वजनिक विकास ट्रस्ट शंकरनगर अकलूज अंतर्गत सुरू असलेल्या ग्रीनफिंगर्स आयुर्वेदिक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर मध्ये  सर्व रोगनिदान शिबिर संपन्न झाले. या शिबिरास रुग्णांनी चांगला प्रतिसाद दिला.  

शिबिराचे उद्घाटन विश्वतेजसिंह रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते व सौ. शिवांशिका विश्वतेजसिंह मोहिते-पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. सदर शिबिरा मध्ये डॉ. समीर दोशी, डॉ. शैलेश गायकवाड, डॉ. रोहित माने देशमुख व डॉ. प्रशांत निंबाळकर यांनी योगदान दिले. 

शिबिर ग्रीनफिंगर्स आयुर्वेदिक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर शंकरनगर अकलूज येथे सकाळी 10:00 ते 02:00 या वेळेत संपन्न झाले.सहसचिव शिवदास शिंदे आणि सर्व सहकारी स्टाफ यांनी शिबिर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या