आता मात्र गप बसू नका
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलन: आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 12/04/2025 :
माझी ही वरील विनंती आपणा कोणासाठी नाही. ही माझी विनंती निवृत्त उच्चपदस्थ पोलीस अधिकारी मुश्रीफ या व्यक्तीबद्दल आहे. गेले दोन दिवस आपल्या देशातील सर्व प्रिंट मीडिया मीडिया व सोशल मीडियावर राणा यास पकडून आणून त्याची चौकशी सुरू केल्याचे बातम्यानी भरून गेली आहेत.
या देशातील सार्वभौमत्वावर 26 /11 ला जो मुंबईत हल्ला झाला या हल्ल्याचा मास्टर माईंड म्हणून राणा यास केंद्र सरकारने अथक प्रयत्न करून अमेरिकेतून आपल्या देशात मुसक्या बांधून आणले आहे. आता त्यांची चौकशी सुरू होईल.
यापूर्वी 26 /11 च्या बद्दलचा खटला चालून त्याची शिक्षा त्यातील अजमल कसाब या अतिरेक्यास भारतीय कायद्यानुसार कामकाज चालून फाशी ही झाली.
26 /11 चा हल्ला हा पाकिस्तान प्रणित होता व भारतातील अनेक देशद्रोही त्यात सामील होते हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ असताना 26/11 चा हल्ला हिंदू दहशतवाद्यांनी केला. त्यामध्ये आर एस एस चा हात होता. हिंदु दहशतवाद्यांनी ठरवून करकरे या पोलिस अधिकाऱ्याचा खात्मा केला असा जावई शोध शमशुद्दीन मुश्रिफ नावाच्या एका पोलिस अधिकार्याने लावला. त्यावर त्यांनी आपल्या विकृती विचारसरणीतून एक पुस्तक लिहिले त्या पुस्तकाचे नाव आहे "हु कील्ड करकरे".या पुस्तकाची प्रचंड प्रमाणात छपाई करण्यात आली. वितरण करण्यात आले. प्रकाशन सोहळे झाले. परिसंवाद झाले व अजमल कसाब या पाकिस्तानी दहशतवादी व पाकिस्तान या सर्वांना निर्दोष ठरवण्याचा या पुस्तकात प्रयत्न झाला. या पुस्तकाचे परिसंवादाचे जंगी कार्यक्रम अगदी आमच्या जिल्ह्यात पण डाव्या विचारसरणीच्या लाल माकडांनी करून दाखवले.
ह्या पक्षाला आता विषय राहिले नाहीत, विचार राहिला नाही व कार्यकर्ते राहिले नाहीत. त्यांनी एकच अजेंडा झाला आहे की संघ व संघ परिवार यांच्या बद्दल ज्या ज्या मार्गाने गरळ ओकता येईल ती ओकणे.
या मुश्रीफ यांनी त्यांचे जे पुस्तक लिहिले आहे त्यामध्ये हा 26/11 चा हल्ला पाकिस्तानचा नसून हिंदू दहशतवाद्यांचा होता असा जावई शोध लावला आहे.
आता मुश्रीफ यांना फार मोठी संधी आहे. त्यांनी जे पुस्तकात दिले ते सर्व खरे आहे व त्यांचे विचार प्रामाणिक आहेत व ते या देशाची प्रामाणिक आहेत, देशद्रोही नाहीत हे सिद्ध करण्याची संधी आली आहे. त्यांनी आता छातीठोकपणे राणाच्या पाठीशी उभारावे, त्याला कायदेशीर मदत मिळवून द्यावी. व 26 /11 चा हल्ला हा पाकिस्तान प्रणित नव्हता तर तो हिंदू दहशतवाद्यांनी घडवलेला का होता हे सिद्ध करण्याची संधीच आहे. त्यांच्या पुस्तकाचे खप करणारे व पोथीनिष्ठ कम्युनिस्ट यांनी हस्तक्षेप याचिका दाखल करावी व सत्य उघडकीला आणावे. असे यांनी केले नाही तर यांनी लिहिलेले पुस्तक खोटे आहे व मुश्रीफ अ प्रामाणिक आहेत हे सिद्ध होईल.
दृश्यम 2 व हु कील्ड करकरे
या हु किल्ड करकरे या पुस्तकावरून मला एक दृश्यम टू या चित्रपटातील कथा आठवत आहे. ज्याने खून केलेला असतो त्याने आपल्या बचावासाठी एक पुस्तक लिहून ठेवले असते व त्याचा नंतर पुस्तकाचा न्यायालयात वापर करून तो मला पोलिसांनी खोटे अडकवले आहे हे सिद्ध करतो. त्याप्रमाणे मुश्रीफ याने हु किल्ड करकरे हे पुस्तक लिहून राणा याच्या बचावाचा रस्ता तयार करून ठेवला आहे काय?
मुश्रीफ आता गप बसू नका. कामाला लागा व राणाच्या पाठीशी राहा.
एडवोकेट अनिल रुईकर
98 232 55 049
इचलकरंजी

0 टिप्पण्या