🟢 "दिर्घायुष्यासाठी दात निरोगी असणे गरजेचे"
-डॉ.सावन पालवे
🔵 पत्रकारांची मोफत दंत रोग तपासणी संपन्न
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 22/03/2025 : आजच्या धावपळीच्या युगात निरोगी शरीरासाठी मौखीक आजार होवु नये याची काळजी घेणे गरजेचे आहे. निरोगी शरीरासाठी आणि दिर्घायुष्यासाठी दात निरोगी असणे महत्वाचे आहे असे मत अकलूज येथील दंतरोग तज्ञ डॉक्टर सावन शिवाजी पालवे यांनी व्यक्त केले.
माळशिरस तालुका मराठी पत्रकार संघ व रूद्रा डेंटल क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने माळशिरस तालुक्यातील पत्रकारांसाठी मोफत दंत रोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी डॉक्टर सावन पालवे यांनी निरोगी दातांचे महत्व, दातांचे आजार आणि त्यावरील ऊपचारांची माहिती दिली.
यावेळी तालुक्यातील जेष्ठ पत्रकार भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे ,चंद्रकांत शिवदास कुंभार, श्रीनिवास कदम-पाटील, राजेंद्र मिसाळ, कृष्णा लावंड, नागेश लोंढे, गणेश जाधव, अर्जुन लक्ष्मण नायकुडे यांच्यासह तालुक्यातील पत्रकार उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉक्टर सावन पालवे म्हणाले की, पत्रकार हा समाजातील महत्वाचा घटक आहे. निरोगी समाजासाठी पत्रकार निरोगी असणे अत्यंत गरजेचे आहे. पत्रकार हे आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करुन समाजासाठी अहोरात्र योगदान देत असतात. त्या सामाजिक बांधिलकीतून आणि सुप्रसिद्ध ह्रदयरोग तज्ञ डॉक्टर एम.के.इनामदार हे दरवर्षी पत्रकारांची मोफत आरोग्य तपासणी करत आले आहेत. त्यांचा आदर्श घेवुन रूद्रा डेंटल क्लिनिक च्या वतीने ही दरवर्षी पत्रकारांची मोफत दंत रोग तपासणी करण्यात येणार आहे असे सांगत. पत्रकार बंधु आणि समाजातील सर्वच नागरीकांनी दातांच्या आजाराकडे दुर्लक्ष करु नये. दातांच्या आजारांची सुरवातीची लक्षणे दिसु लागताच तज्ञांकडे जावुन सल्ला व उपचार घेतले तर भविष्यात होणाऱ्या दातांच्या गंभीर आजारापासुन मुक्ती मिळु शकते. तसेच रूद्रा डेंटल क्लिनिक ने अल्पावधीतच मिळविलेल्या यशात तालुक्यातील पत्रकार बंधुंचे मोलाचे योगदान असल्याचे ही यावेळी आवर्जून सांगितले.
0 टिप्पण्या