प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ जिल्हा सोलापूर संचलित मोफत ज्येष्ठ नागरिक वाचनालयाचे उद्घाटन

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ जिल्हा सोलापूर  संचलित

मोफत ज्येष्ठ नागरिक वाचनालयाचे उद्घाटन

वृत्त एकसत्ता न्यूज

आकाश भाग्यवंत नायकुडे

मुंबई दिनांक 24/02/2025 : माळेवाडी - अकलूज (तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर) येथे प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ जिल्हा सोलापूर  संचलित "मोफत ज्येष्ठ नागरिक वाचनालयाचे" उद्घाटन सौ.देवन्या शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

अकलूज ग्रामपंचायतचे माजी सरपंच  शिवतेजसिंह उदयसिंह मोहिते-पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ जिल्हा सोलापूर च्या वतीने दरवर्षी समाज हितोपयोगी विविध उपक्रम राबविले जातात. त्यामध्ये अनाथ आश्रमात अन्नदान, खाऊ वाटप, वृक्षारोपण, शैक्षणिक साहित्य वाटप, विविध स्पर्धा, गुणवंत पुरस्कार, स्वच्छता मोहीम, शैक्षणिक साहित्य वाटप इत्यादी बहुविध  उपक्रमांचा समावेश असतो. यावेळी जिल्हाध्यक्ष सोमनाथ खंडागळे आणि उपाध्यक्ष शशिकांत कडबाने यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात प्रथमच मोफत वृत्तपत्र वाचनालयाचा शुभारंभ माळेवाडी अकलूज येथे करण्यात आला.

  यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना उद्घाटक सौ.देवन्या मोहिते-पाटील म्हणाल्या की, प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाने मोफत जेष्ठ नागरिकांसाठी वाचनालय सुरू केलेला उपक्रम हा स्तुत्यपर असून वयोवृद्धांसाठी विरंगुळ्याचे ठिकाण ठरणार आहे.या वाचनालयमुळे त्यांच्या आनंदात व ज्ञानात भर पडणार आहे.



यावेळी अंधश्रद्धा निर्मुलनचे व्याख्याते व वनस्पतीशास्त्र विभागाचे माजी प्रा.रामलिंग सावळजकर,  ज्येष्ठ पत्रकार भाग्यवंत ल. नायकुडे, पत्रकार लक्ष्मीकांत कुरूडकर, पत्रकार संजय लोहकरे, सुनील ज्ञानेश्वर कांबळे, विशाल साठे, सचिन झेंडे, अनुराग खंडागळे, पृथ्वीराज कारंडे, प्रकाश भोसले, लालुभाई शेख, बल्लू देशमुख, विजय सुर्यवंशी, रघुनाथ देशमुख, अण्णासाहेब जगदाळे, दादा थीटे,अशोक कोळी आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे जिल्हा उपाध्यक्ष शशिकांत म. कडबाने यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ खंडागळे यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या