सहकार महर्षि अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 20/02/2025 : अकलूज येथील सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च या अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये शिवजयंतीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. डॉ. प्रवीण ढवळे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले आणि महाराष्ट्र गीत गायन झाले. त्यानंतर महाविद्यालयातील प्रा. श्रेया देशमुख, प्रा.मयुरी ननवरे, प्रा.संजीवनी भोसले यांनी आपले विचार व्यक्त केले. तसेच चि.शिवतेज माने देशमुख (द्वितीयवर्ष कॉम्पुटर इंजिनीयर), कु. प्रगती लोखंडे(द्वितीयवर्ष कॉम्पुटर इंजिनीयर), चि.रामकृष्ण गायकवाड (द्वितीयवर्ष सिविल इंजिनीयर), व कु.गीता रितोंडे (प्रथमवर्ष कॉम्पुटर इंजिनीयर) यांनी आपले विचार व्यक्त केले त्यामध्ये त्यांनी शिवरायांच्या कार्यविषयी माहिती सांगितली. महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की आजच्या युवकांनी शिवाजी महाराजांचे गुण आत्मसात करणे गरजेचे आहे. त्यामध्ये त्यांनी महाराजांच्या विचारांचे आचरण केल्यानंतर माणसाची प्रगती होऊ शकते व समाज परिवर्तन करायला मदत होते असे सांगितले.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन व प्रस्ताविक प्रा.श्रेया देशमुख यांनी केले. या कार्यक्रमासाठी प्राचार्य डॉ. प्रवीण ढवळे, कार्यालयीन अधीक्षक, समन्वयक, सर्व विभागाचे विभाग प्रमुख सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
0 टिप्पण्या