शंकरनगरच्या महाशिवरात्र यात्रा महोत्सवाचा शुभारंभ

 

शंकरनगरच्या महाशिवरात्र यात्रा महोत्सवाचा शुभारंभ 

 वृत्त एकसत्ता न्यूज

आकाश भाग्यवंत नायकुडे 

मुंबई दिनांक 23/02/2025 : महाशिवरात्र यात्रा महोत्सव समिती चॅरिटेबल ट्रस्ट शंकरनगर (पोस्ट यशवंतनगर, तालुका माळशिरस, जिल्हा महाराष्ट्र राज्य) यांचे विद्यमाने सालाबाद प्रमाणे आयोजित केलेल्या महाशिवरात्र यात्रा महोत्सवाचे उद्घाटन ट्रस्टचे कार्याध्यक्ष मदनसिंह शंकरराव मोहिते पाटील (सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती अकलूज) यांचे हस्ते रविवार दिनांक 23 रोजी सायंकाळी 5 वाजता संपन्न झाले. दिनांक 23 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारी या कालावधीत आयोजित केलेल्या यात्रा महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह शंकरराव मोहिते पाटील, यात्रा महोत्सव समिती चॅरिटेबल ट्रस्ट अध्यक्ष जयसिंह शंकरराव मोहिते पाटील (चेअरमन, सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखाना लि.शंकरनगर-अकलूज), कु. स्वरूपाराणी जयसिंह मोहिते पाटील, जनरल सेक्रेटरी राजेंद्र केरबा चौगुले, यांचे सह विविध संस्थांचे पदाधिकारी अधिकारी कर्मचारी आणि  मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते. सहकार महर्षि कै.शंकरराव नारायणराव मोहिते पाटील यांनी स्थापन केलेल्या महाशिवरात्र यात्रा महोत्सव समिती चॅरिटेबल ट्रस्टचे हे 55 वे वर्ष आहे.

अभिषेक व महापूजा

महाशिवरात्री निमित्त शंकरनगर येथील शिवपार्वती मंदिरामध्ये बुधवार दिनांक 26 फेब्रुवारी रोजी पहाटे 5:30 वाजता आमदार रणजितसिंह विजयसिंह मोहिते पाटील आणि त्यांच्या सुविध्य पत्नी सौ. सत्यप्रभादेवी रणजितसिंह मोहिते पाटील (चेअरमन,दि. ग्रीन फिंगर्स ग्लोबल स्कूल, खारघर, मुंबई) या उभयतांच्या हस्ते अभिषेक व महापूजा आयोजित केली आहे 

जंगी निकाली कुस्त्यांचा फड

महाशिवरात्र यात्रा महोत्सवा निमित्त "शिवतीर्थ" आखाडा शंकरनगर येथे जंगी निकाली कुस्त्यांच्या फडाचे उद्घाटन व विजेत्या मल्लांना बक्षीस वितरण सोहळा गुरुवार दिनांक 27 फेब्रुवारी रोजी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह शंकरराव मोहिते पाटील व कार्याध्यक्ष मदनसिंह शंकरराव मोहिते पाटील यांच्या हस्ते संपन्न होणार आहे

महाशिवरात्री यात्रा महोत्सव निमित्त जनावरांचा भव्य बाजार कृषी व औद्योगिक प्रदर्शन पीक स्पर्धा दुग्ध स्पर्धा  इत्यादींचे आयोजन करण्यात आलेले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या