सहकार महर्षि अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची बॉश चासिस प्रायव्हेट लिमिटेड, पुणे मध्ये निवड

 

सहकार महर्षि अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची बॉश चासिस प्रायव्हेट लिमिटेड, पुणे मध्ये निवड

वृत्त एकसत्ता न्यूज

आकाश भाग्यवंत नायकुडे

मुंबई दिनांक 21/02/2025 : अकलूज येथील सहकार महर्षि  शंकरराव मोहिते पाटील इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च, शंकरनगर मधील तृतीय वर्ष मेकॅनिकल अभियांत्रिकी मधील ४ विद्यार्थ्यांची बॉश चासिस प्रा. लि., पुणे येथील  नामांकित कंपनी मध्ये निवड झाल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण  ढवळे यांनी दिली.  

याबद्दल अधिक माहिती देताना डॉ. प्रवीण ढवळे  म्हणाले, अग्रगण्य असणाऱ्या कंपनीपैकी बॉश चासिस प्रायव्हेट लिमिटेड पुणे या नामांकित कंपनीच्या प्लेसमेंट ड्राइव्हचे आयोजन शहाजीराव पाटील विकास प्रतिष्ठान एस.बी.पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय इंदापूर येथे केले होते. सदर ड्राइव्ह साठी परिसरातील विविध अभियांत्रिकी महाविद्यालयांमधून विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. याच प्रसंगी सहकार महर्षि अभियांत्रिकी महाविद्यालयातील पदविका विभागातील सहभागी विद्यार्थ्यांपैकी कु.गौरी माने, चि.विश्वजीत जानकर, चि.अकिब मुलाणी व चि.प्रथमेश माने-देशमुख या चार विद्यार्थ्यांची बॉश चासिस प्रायव्हेट लिमिटेड पुणे येथे निवड झाली आहे.  

सदर निवडी बद्दल ट्रस्टचे अध्यक्ष जयसिंह शंकरराव मोहिते पाटील,  महाविद्यालयाच्या विकास समिती अध्यक्षा स्वरूपाराणी जयसिंह मोहिते पाटील, ट्रस्टचे सचिव राजेंद्र चौगुले,  प्राचार्य डॉ. प्रवीण ढवळे यांनी अभिनंदन करून विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्या दिल्या. तसेच मागील वर्षी प्रमाणे यावर्षी देखील शंभर टक्के प्लेसमेंटची  आशा व्यक्त केली.

विभाग प्रमुख प्रा. निकम एस. एम., कॉलेजचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा.शेटे वाय. एस. तसेच समन्वयक प्रा.धनवले पी.एस. यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या