💢 भारतीय राष्ट्रवादी पार्टीला सशक्त, मजबूत बनविण्याचा निर्धार 🟪 दिल्लीत मुख्य कार्यालयातील बैठकीतील निर्णय 🟦 सदस्य नोंदणी अभियानास वेग

💢 भारतीय राष्ट्रवादी पार्टीला सशक्त, मजबूत बनविण्याचा निर्धार

🟪 दिल्लीत मुख्य कार्यालयातील बैठकीतील निर्णय

🟦 सदस्य नोंदणी अभियानास वेग

वृत्त एकसत्ता न्यूज

नवी दिल्ली येथून 

भाग्यवंत लक्ष्मण  नायकुडे

 दिनांक 12/02/2025 : भारत देशातील अनेक राज्यात जनहिताचे सामाजिक कार्य करणाऱ्या आणि आपल्या संविधानाने प्रत्येक देशवासीयांना दिलेल्या मानव हक्काच्या हनन विरोधात लढणाऱ्या देशातील एकमेव राजकीय पक्ष असलेल्या भारतीय राष्ट्रवादी पार्टीच्या कार्यकारी समितीची तातडीची बैठक पक्षाच्या दिल्लीतील सेंट्रल कार्यालयात राष्ट्रीय प्रधान महासचिव डॉ. भगवानभाई दाठिया यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत मुंबई - महाराष्ट्र, जम्मू - काश्मीर, पंजाब, उत्तर प्रदेश, हरियाणा, दिल्ली, झारखंड, गुजरात सहित विविध राज्यातील राष्ट्रीय कार्यकारी समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. तातडीने घेण्यात आलेल्या बैठकीत राष्ट्रीय अध्यक्ष चौधरी गुलाब सिंह यांनी आपल्या काही खाजगी कारणांमुळे दिलेला राजीनामा बहुमताने नामंजूर करण्यात आला. आणि  त्यांनाच  राष्ट्रीय अध्यक्ष पदावर कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच राजीनामा दरम्यान चौधरी गुलाब सिंह यांनी ज्यांच्या नवीन नियुक्त्या केल्या होत्या त्या सर्व नियुक्तींना अवैध ठरवून रद्द करण्याचा एकमताने निर्णय घेण्यात आला. आणि सर्व राज्यांत पक्षाच्या राष्ट्रीय पदाधिकारी यांच्या नेतृत्वात मोठ्या जोमाने सदस्य अभियान सुरू करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. आणि ज्या लोकांनी भारतीय राष्ट्रवादी पार्टीच्या नावाचा गैरवापर करून आर्थिक फसवणूक करण्याचा प्रयत्न केला असेल तर त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे राष्ट्रीय प्रधान महासचिव डॉ. भगवानभाई दाठीया यांनी बैठकी दरम्यान उपस्थितांचे स्वागत माळा देवून सत्कार केल्यानंतर इशारा दिला. या बाबत आम्ही अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला असता काही लोकांनी बेकायदेशीररित्या पक्षाचा दुरुपयोग केला असल्याचे समजले. राष्ट्रीय कार्यकारी समिती द्वारे तातडीने घेण्यात आलेल्या या बैठकी नंतर पुढे काय प्रतिक्रिया घडणार किंवा राष्ट्रीय पदाधिकारी पुढचा निर्णय काय घेणार हे येणाऱ्या काळात उघड होणारच आहे.

तातडीच्या राष्ट्रीय बैठकीसाठी राष्ट्रीय अध्यक्ष चौधरी गुलाब सिंह, राष्ट्रीय प्रधान महासचिव डॉ. भगवानभाई दाठिया, राष्ट्रीय संघटन मंत्री मनोज कुमार चौबे, राष्ट्रीय सचिव भाग्यवंत ल. नायकुडे, राष्ट्रीय सचिव रतन चंद, राष्ट्रीय सचिव फयाज अहमद डार, राष्ट्रीय सचिव सुबोध कुमार,  राष्ट्रीय सचिव इम्तियाज यांच्यासह सुधीष यादव, मनीष दाभाडे, हरेकृष्ण जोशी, संजू गोसावी इत्यादींसह अनेक महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित होते. सर्वांनी भारतीय राष्ट्रवादी पार्टीला सशक्त आणि मजबूत बनविण्याचा निर्धार व्यक्त केला.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या