सहकार महर्षि अभियांत्रिकीतील मेकॅनिकल व इलेक्ट्रिकल पदविका विभागामार्फत “रोबोटिक्स आणि ऑटोमेशन” या विषयावर गेस्ट लेक्चरचे आयोजन
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 27/02/2025 : अकलूज येथील सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च, शंकरनगर- अकलूज या अभियांत्रिकी महाविद्यालयातील पदविका मेकॅनिकल व इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी विभागामार्फत महाविद्यालयीन विकास समिती अध्यक्षा स्वरूपाराणी जयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली “रोबोटिक्स आणि ऑटोमेशन” या विषयावर प्रा. उमेश घोलप (सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर) यांचे व्याख्यान आयोजन केल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण ढवळे यांनी दिली. प्रा. उमेश घोलप यांनी रोबोटिक्स आणि ऑटोमेशन बद्दल बोलताना त्यांनी रोबोट्सचे डिझाइन, निर्मिती, फायदे , तोटे, प्रकार आणि रोबोटिक्स आणि ऑटोमेशन अभियांत्रिकीमध्ये करिअरच्या संधी याबद्दल माहिती दिली. रोबोटिक्स आणि ऑटोमेशन अभियांत्रिकीमध्ये संगणक अभियांत्रिकी, यांत्रिक अभियांत्रिकी, इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी, आणि सॉफ्टवेअर अभियांत्रिकी यांचे ज्ञान वापरले जाते. पुढे बोलताना त्यांनी सांगितले कि, रोबोटिक्स आणि ऑटोमेशन उत्पादन क्षेत्रात स्वयंचलित असेंब्ली लाईन्स, मटेरियल हाताळणी, आणि गुणवत्ता नियंत्रणासाठी रोबोट डिझाइन आणि विकसित करणे व कृषी, खाणकाम, एरोस्पेस, आरोग्यसेवा, आणि संरक्षण या क्षेत्रात रोजगार पर्यावरण संरक्षण आणि सुरक्षिततेवर भर यावर काम करते असे त्यांनी सांगितले. तसेच डॉ. प्रवीण ढवळे यांनी डिग्री विभागांमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजंट डेटा सायन्स यावर्षी चालू आहे व डिप्लोमा विभागांमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजंट व मशीन लर्निंग शैक्षणिकवर्ष २०२५-२६ मध्ये चालू होणार असल्याची माहिती दिली.
सदर सत्रासाठी महाविद्यालयातील मेकॅनिकल व इलेक्ट्रिकल विभागाचे विभागप्रमुख प्रा. निकम एस.एम. व प्रा. कांबळे एस. एस. तसेच विभागातील सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्तावना प्रा.पांढरे व्ही.बी. यांनी केले तर आभार प्रदर्शन पदविका मेकॅनिकल विभागाचे विभागप्रमुख प्रा. स्वप्नील निकम यांनी केले. सदर कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी प्रा.पल्लवी फुले व प्रा.पांढरे व्ही.बी. यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

0 टिप्पण्या