चांदापूरी येथे ओंकार साखर कारखान्यावर प्रजासत्ताक दिन साजरा
वृत्त एकसत्ता न्यूज
निमगाव / प्रतिनिधी दिनांक 26/01/2025 : ओंकार साखर कारखाना चांदापुरी (तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर) कार्यस्थळावर ७६ व्या प्रजासत्ताकदिनानिमित्त ओंकार साखर कारखाना परिवाराचे संचालक प्रशांतराव बोत्रे-पाटील यांच्या हस्ते ध्वज फडकावून राष्ट्रीय ध्वजास मानवंदना देण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनरल मॅनेजर भिमराव वाघमोङे होते.
या वेळी बोलताना प्रशांत बोत्रे-पाटील म्हणाले ङाॅक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना तयार करताना सर्वसामान्य माणसाचे, कामगारांचे, समाजातील सर्व घटकांना समोर ठेवून घटना तयार केली ही कौतुकास्पद बाब आहे.
ओंकार साखर कारखाना परिवाराचे चेरअमन बाबुराव बोत्रे-पाटील पाटील संचालिका रेखाताई बोत्रे-पाटील यांच्या मार्गदर्शकनाखाली ऊस उत्पादक शेतकरी, कामगार, ऊस वाहतुकदार, ऊस तोङणी कामगार यांचे हित जोपासुन पारदर्शक कारभार करून या भागाचा कायापालट केला असे म्हणाले. या वेळी कर्मचारीवर्ग व सुरक्षा रक्षक यांना खाऊचे वाटप करण्यात आले. या वेळी मेजर मोहन घोडके, केन मॅनेजर शरद देवकर, चीफ इंजिनिअर तानाजीराव देवकते, धनाजी पवार, गणेश धायगुङे, अमोल तरंगे, ऊस उत्पादक शेतकरी रामचंद्र मगर, नितीन जाधव, बापु वाघमोङे इत्यादी उपस्थित होते. आभार रमेश औताडे यांनी मानले.
0 टिप्पण्या