सहकार महर्षि अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे हिवाळी परीक्षा २०२४ मध्ये उत्तुंग यश
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 30/01/2025 : महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुबई यांनी घेतलेल्या अभियांत्रिकी पदविका हिवाळी परीक्षा २०२४ मध्ये सहकार महर्षि अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उतुंग यश संपादन केले असल्याची माहिती संस्थेचे सचिव राजेंद्र चौगुले व प्राचार्य डॉ. प्रविण ढवळे सर यांनी दिली.
कॉम्प्युटर विभागातील अंतिम वर्षातील अभियांत्रिकीच्या शेख अब्दाल (९३.८९) प्रथम क्रमांक, बचुटे आदित्य (९१.८९) द्वितीय क्रमांक, येवले साक्षी (९०.७८) तृतीय क्रमांक, व कॉम्प्युटर विभागातील द्वितीय वर्षातील अभियांत्रिकी पदविकेच्या पेटकर श्रद्धा (९६.००) यांनी प्रथम क्रमांक, स्वरांजली माने-देशमुख (९२.९४). द्वितीय क्रमांक, स्नेहा माने-देशमुख (८७.७७) हिने तृतीय क्रमांक मिळवला आहे तसेच कॉम्प्युटर विभागातील प्रथम वर्ष अभियांत्रिकी पदविकेच्या शेख माहेविश हिने (८५.८८) यांनी प्रथम क्रमाक, तलवार अप्पासाहेब (८५.२९) द्वितीय क्रमांक, धनश्री माने (८३.४१) तृतीय क्रमांक, मिळवला आहे.
सिव्हील विभागातील अंतिम वर्षातील अभियांत्रिकीच्या क्षिरसागर वर्षाराणी (८३.६०) प्रथम क्रमांक, जगताप प्रज्वल (८२.८०) टक्के द्वितीय क्रमांक, डांगे ऋतुजा (७७.८०) तृतीय क्रमांक, व सिव्हील विभागातील द्वितीय वर्षातील अभियांत्रिकी पदविकेच्या भिंगारदिवे जयराज (८३.७७) यांनी प्रथम क्रमांक, गायकवाड रामकृष्ण (७२.९४). द्वितीय क्रमांक, साठे श्रावणी (७२.५९) हिने तृतीय क्रमांक मिळवला आहे तसेच सिव्हील विभागातील प्रथम वर्ष अभियांत्रिकी पदविकेच्या धीरज वीरकर (७८.९४), यानी प्रथम क्रमाक, श्रुष्टी भोंग (७६.५९) द्वितीय क्रमांक, सोनाली करगळ (७६.३५) यांनी तृतीय क्रमांक मिळवला आहे.
मेकॅनिकल विभागातील अंतिम वर्षातील अभियांत्रिकीच्या गायत्री माने (८६.१९) प्रथम क्रमांक, प्रणव जाधव (८५.३३) द्वितीय क्रमांक, दर्शन मोरे (८०.००) तृतीय क्रमांक, व मेकॅनिकल विभागातील द्वितीय वर्षातील अभियांत्रिकी पदविकेच्या शंभूराजे क्षिरसागर (८१.२२) यांनी प्रथम क्रमांक, क्रांती ऐकतपुरे (८०.७८). द्वितीय क्रमांक, शहीद मुलाणी (७६.००) टक्के यांनी तृतीय क्रमांक मिळवला आहे तसेच मेकॅनिकल विभागातील प्रथम वर्ष अभियांत्रिकी पदविकेच्या वाघ रितेश (८१.५३) यानी प्रथम क्रमाक, चोपडे लक्ष्मि (७७.७६) द्वितीय क्रमांक, निकम वेदांत (७६.८२) यांनी तृतीय क्रमांक, मिळवला आहे.
इलेक्ट्रिकल विभागातील अंतिम वर्षातील अभियांत्रिकीच्या संभाजी भंडलकर (८९.००) प्रथम क्रमांक,
प्रसन्न मुळे (८८.९०) द्वितीय क्रमांक, यश जावळे (८५.१०) तृतीय क्रमांक, व इलेक्ट्रिकल विभागातील द्वितीय वर्षातील अभियांत्रिकी पदविकेच्या आदित्य सालगुडे-पाटील (८८.८२) यांनी प्रथम क्रमांक, वैष्णव बोरडे (८४.४७) द्वितीय क्रमांक, रामहरी निकम (८२.५९) यांनी तृतीय क्रमांक मिळवला आहे तसेच
इलेक्ट्रिकल विभागातील प्रथम वर्ष अभियांत्रिकी पदविकेच्या अनिकेत धानोरकर (८३.७६.), यानी प्रथम क्रमाक, गौरी जगताप (८१.४१) द्वितीय क्रमांक, तनिष्का काळे (८०.८२) तृतीय क्रमांक, मिळवला आहे.
कॉम्प्युटर विभागातील अंतिम वर्षातील अभियांत्रिकीच्या ४७ विद्यार्थ्यां पैकी ४५ विद्यार्थांना विशेष श्रेणी मिळाली आहे.
यशस्वी विद्याथ्यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष श्री. जयसिंह शंकरराव मोहिते - पाटील व महाविद्यालय विकास समिती अध्यक्षा कु. स्वरूपाराणी जयसिंह मोहिते - पाटील संस्थेचे सचिव राजेंद्र चौगुले, प्राचार्य डॉ. प्रविण ढवळे सर, कार्यालयीन अधीक्षक श्री. शब्बीर शेख यांच्यासह सर्व विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले.
0 टिप्पण्या