जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची सोलापूरात बैठक संपन्न

जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची  सोलापूरात बैठक संपन्न 

वृत्त एकसत्ता न्यूज

आकाश भाग्यवंत नायकुडे

मुंबई दिनांक 25/01/2025 :

जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची (दिशा) बैठक सोलापूर येथे समितीचे अध्यक्ष खा.प्रणिती शिंदे व सह अध्यक्ष खासदार मा.धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. याप्रसंगी केंद्र सरकारच्या प्रमुख योजनांचा आढावा घेत विविध विषयांवर विस्तृत चर्चा करण्यात आली तसेच प्रलंबित कामे मार्गी लावण्याचे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना निर्देश दिले.

यावेळी प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, प्रधानमंत्री फसल बीमा योजना, राष्ट्रीय पेयजल योजना, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, प्रधानमंत्री आवास योजना (मिशन), स्वच्छ भारत मिशन(शहर), जलजीवन मिशन, एकात्मिक बाल विकास योजना, सर्व शिक्षा अभियान, राष्ट्रीय स्वास्थ मिशन व महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना या सर्व योजनांच्या कामांचा सविस्तर आढावा घेत सोलापूर जिल्ह्यात केंद्र सरकारच्या सदरील योजना मोठ्या प्रमाणात राबवण्यासंदर्भात अधिकारी वर्गाला निर्देश दिले.  

तसेच या बैठकीतून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी ,स्थानिक प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातून जिल्ह्याचा विकास मोठ्या प्रमाणात कसा होईल याबाबत सखोल चर्चा केली.

यावेळेस विशेष निमंत्रित खा.ओमराजे निंबाळकर, आमदार राजू खरे,आ.अभिजीत पाटील,आ.डाॅ.बाबासाहेब देशमुख,आ.नारायण पाटील,सोलापूर जिल्हाधिकारी, सोलापूर मनपा आयुक्त,जि.प. मुख्याकार्यकारी अधिकारी,इतर सर्व विभागाचे अधिकारी मान्यवर उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या