सहकार महर्षि शंकराव मोहिते पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये "टेकमहर्षी २०२५" टेक्निकल इव्हेंट संपन्न

 

सहकार महर्षि शंकराव मोहिते पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये "टेकमहर्षी २०२५" टेक्निकल इव्हेंट संपन्न

वृत्त एकसत्ता न्यूज

आकाश भाग्यवंत नायकुडे

मुंबई दिनांक 19 जानेवारी 2025 :

सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च, शंकरनगर-अकलूज या अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये दिनांक १८/०१/२०२५ रोजी "टेकमहर्षी २०२५" हा टेक्निकल इव्हेंट महाविद्यालय विकास समिती अध्यक्षा कु. स्वरूपाराणी जयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य. डॉ. प्रवीण ढवळे यांनी दिली.

या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. शिवप्रसाद टिळेकर प्रभारी प्राचार्य शंकरराव मोहिते महाविद्यालय अकलूज हे उपस्थित होते.

यामध्ये टेक्निकल इव्हेंट मध्ये प्रकल्प स्पर्धा,  पोस्टर सादरीकरण स्पर्धा , प्रश्नमंजुषा स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा ह्या विविध स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धेमध्ये दहावी व बारावी मधील ११ महाविद्यालयांमधून एकूण ३६५ विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला. 

इयत्ता दहावी मधून प्रकल्प स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक चि. शुभम माने व चि. आदित्य घाडगे सहकार महर्षि शंकराव मोहिते पाटील विद्यालय वेळापूर, द्वितीय क्रमांक चि.आदिनाथ भोसले, चि.पृथ्वीराज जगदाळे व चि. करण पनासे सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील विद्यालय वेळापूर व तृतीय क्रमांक चि. कुणाल जाधव मोरजाई विद्यालय मोरोची. पोस्टर सादरीकरण या स्पर्धेमध्ये इयत्ता दहावी मधून प्रथम क्रमांक कु.केतकी गायकवाड द्वितीय क्रमांक कु.श्रुती धुणे व तृतीय क्रमांक कु.करुणा विजयकुमार बनसोडे सहकार महर्षि शंकराव मोहिते पाटील विद्यालय वेळापूर व इयत्ता बारावी मधून प्रथम क्रमांक कु.प्रियल चव्हाण व कु.श्रेया राऊत, द्वितीय क्रमांक कु. वैष्णवी काटे व कु.मृणाली सूर्यवंशी तृतीय क्रमांक कु.दिव्या गुजर शंकरराव मोहिते महाविद्यालय, माळेवाडी. प्रश्नमंजूशा स्पर्धेमध्ये इयत्ता दहावी मधून प्रथम क्रमांक कु.वर्षा सुळ मोरजाई विद्यालय, मोरोची, द्वितीय क्रमांक कु.भक्ती जाधव लक्ष्मीबाई कन्या प्रशाला, यशवंतनगर,  तृतीय क्रमांक कु. स्वप्नील देशमुख सदाशिवराव माने विद्यालयल,अकलूज व इयत्ता 12 वी मधून प्रथम क्रमांक कु. किर्ती जाधव, द्वितीय क्रमांक चि. संस्कार  सुरवसे व तृतिय क्रमांक कु. स्नेहल गोडसे शंकरराव मोहिते महाविद्यालय,माळेवाडी. व वक्तृत्व स्पर्धेमध्ये इयत्ता 10 वी मधून प्रथम क्रमांक रूमाना सय्यद द्वितीय क्रमांक सृष्टी रेडेकर जिजामाता कन्या प्रशाला,अकलूज व तृतीय क्रमांक कु. वैष्णवी फुले मोरजाई विद्यालय, मोरोची या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.

यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष जयसिंह मोहिते - पाटील महाविद्यालय विकास समिती अध्यक्षा कु. स्वरूपाराणी मोहिते-पाटील संस्थेचे सचिव राजेंद्र चौगुले तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.प्रवीण ढवळे यांनी अभिनंदन केले. सदर स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी स्पर्धेचे समन्वयक म्हणून प्रा. रिसवडकर .व्ही. एस, प्रा. शेंडगे एस.टी, प्रा.चौगुले.एस. एस, प्रा. यादव एच. ए तसेच सर्व विभागाचे विभाग प्रमुख शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी काम पाहिले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रीती सोमवंशी व कु.मीनाक्षी राऊत यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या