श्रीपूर मध्ये सार्वजनिक स्वच्छतागृह व शौचालये नसल्याने आरोग्यास धोकादायक स्थिती

 श्रीपूर मध्ये सार्वजनिक स्वच्छतागृह व शौचालये नसल्याने आरोग्यास धोकादायक स्थिती

वृत्त एकसत्ता न्यूज 

श्रीपूर/प्रतिनिधी दिनांक 26/01/2025 :

श्रीपूर ( तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर) मध्ये सार्वजनिक स्वच्छतागृह, शौचालय नसल्याने या परिसरातील काही नागरिक रस्त्यावर लघूशंका करत असल्याने छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसरात अक्षरशः चोहोबाजूंनी दुर्गंधी पसरली आहे तर पुढे गेले की भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक पाठीमागे नीरा उजवा कालवा फाटा लगत उघड्यावर नागरिक शौचविधी, लघुशंका करत असल्याने त्या परिसरात दुर्गंधी व घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे  या परिसरातील नागरिकांना भयंकर त्रास सहन करावा लागत आहे. या अडचणी तर आहेतच परंतु काही अज्ञात चिकन सेंटर चालवणारे विक्रेते यांनी संपूर्ण रस्त्यांवर कोंबडीचे पिसे व टाकाऊ पदार्थ टाकत असल्याने संपूर्ण रस्त्यांवर पांढऱ्या पिसांचा खच पडलेला आहे या कडे नगरपंचायत कसलेही लक्ष देत नसल्याचे नागरिकांनी म्हटले आहे. वर उल्लेख केलेल्या परिसरात दुर्गंधी मुळं नागरिकांना नाकाला रुमाल बांधून थांबावे लागते. श्रीपूर हे गाव पुर्व भागातील दळणवळण आलेलं महत्वाचे केंद्र आहे त्यामुळे दररोज श्रीपूरला पंधरा ते वीस गावांचा, खेड्यांचा संपर्क असतो. या लोकांना लघूशंका करण्यासाठी सार्वजनिक स्वच्छतागृह नसल्याने ते श्रीपूर मध्ये रस्त्यावर, कारखान्याचे भिंतीवर कुठेही लघूशंका करतात. त्यामुळे चौकात थांबणारे प्रवासी, येथील स्थानिक टपरीधारक चहा व्यावसायिक, दुकानदार यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. महाळुंग श्रीपूर नगरपंचायत ने या बाबींकडे गांभीर्याने लक्ष देऊन सार्वजनिक स्वच्छतागृह शौचालय बांधून सदर दुर्गंधी पासून येथील नागरिकांना वाचविण्याची गरज आहे. या विषयाकडे स्थानिक नगरसेवक कार्यकर्ते यांनी आवाज उठवला पाहिजे.  घरोघरी जाऊन कचरा घेऊन कचरा गाडी येते मात्र सार्वजनिक रस्त्यावर परिसरातील साफसफाई सुध्दा आठवड्यातून एकदा तरी केली तरच स्वच्छता होऊ शकते. श्रीपूर मधील दोन महापुरुषांच्या स्मारक परिसरात उघड्यावर लघूशंका, शौच करणार्‍यांना रोखण्यासाठी नगरपंचायत ने भरारी पथक नेमून कारवाई केली तरच असले प्रकार थांबतील.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या