संपादकीय...........
ना खाऊंगा ना खाने दूंगा..!
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
वृत्त एकसत्ता न्यूज
अकलूज दिनांक 30/01/2025 : भारत पाकिस्तान फाळणीच्या आधी मोहमद जिन्नाच्या डोक्यात एक प्लॅन चालला होता.फाळणी करताना आपल्या देशात 100 पेक्षा जास्त संस्थानिक हे मुस्लिम नवाब होते.त्यामध्ये भोपाळ,हैद्राबाद सहित अनेक छोटे मोठे संस्थानिक मुस्लिम होते.
जिन्नाच्या प्लॅन नुसार पाकिस्तान वेगळा करून झाल्यावर या मुस्लिम राज्यकर्त्यांना ताकद द्यायची अन त्यांनी भारताविरुद्ध जाऊन आणखीन 100 पाकिस्तान निर्माण करायचे होते जेणेकरून भारताचे 100 तुकडे पडावे.
पण सरदार पटेलांनी जिन्नाचे स्वप्न धुळीस मिळवले अन देश अखंड ठेवला.
देशाविरुद्ध असलेल्या या संस्थानिकापैकी एक भोपळचा नवाब होता.त्याला पाकिस्तानमध्ये सामील व्हायचे होते पण पटेलांच्या पुढे त्याचे अन त्याच्या सारख्या गद्दारांचे काही चालले नाही.
1961 साली चीन विरुद्ध झालेल्या युद्धात देशातील सगळे कम्युनीच भारतासोबत गद्दारी करून चिनसोबत उभे राहिले.त्यानंतर 1968 साली पाकिस्तानसोबत युद्ध झाल,त्यावेळी काँग्रेस सरकारने एनिमी प्रॉपर्टी ऍक्ट 1968 आणला.या कायद्याच्या आधारे जे मुस्लिम इथे सगळी प्रॉपर्टी ठेऊन पाकिस्तानाला गेले,
किंवा इथे राहून भारतासोबत गद्दारी करून शत्रू राष्ट्रासोबत उभा होते त्यांच्या सगळ्या प्रॉपर्टी शत्रू संपत्ती घोषित करून केंद्राने जप्त कराव्या.
याचं कायद्याच्या आधारे भोपाळ नवाबची भोपळमधली संपत्ती केंद्राच्या ताब्यात गेली असती.
पण नंतर भोपाळच्या नवाबच्या मोठ्या मुलीने जी पाकिस्तानमध्ये पळून गेली तीने सगळी संपत्ती तिच्या लहान बहिणीला म्हणजे हरियाणाचा नवाब पतोडीच्या बायकोला दिली.त्यामुळेच आज ती संपत्ती सैफ अली खानकडे हस्तांतरीत झालीय..
मुळात जी संपत्ती शत्रू संपत्ती घोषित केलेली आहे तिचे हस्तांतरण होऊच शकत नाही.अन त्यावेळी असलेले काँग्रेसी नेतृत्व यावर गप्प बसले.अन कहर म्हणजे इथे काँग्रेसने आणखीन एक कायदा ज्याला कस्टोडियन ऍक्ट पास केला की जी संपत्ती शत्रू संपत्ती म्हणून घोषित केली आहे त्या संपत्तीला इथला कोणीही नागरिक वारस म्हणून घोषित करू शकतो. म्हणजे जे मुस्लिम देश सोडून गेले आहेत त्यांची संपत्ती सरकारच्या ताब्यात घेणं गरजेचं असताना त्यांनी ते न करता ती संपत्ती त्यांच्या इथे उरलेल्या वारसांना देण्यात यावी असा कायदाच पास केला.
म्हणजे 5 मुस्लिम भाऊ पाकिस्तानला आहेत अन एक इथे राहिला तर त्या 5 गद्दारांची प्रॉपर्टी इथे राहिलेल्या एका भावाला देण्यात यावी.
म्हणजे कहर आहे की नाही..?
काँग्रेसच्या याचं मुस्लिम धार्जिन्या वृत्तीमुळे देशाची फाळणी झाली.पाकिस्तान निर्माण झाला.त्यांना 10 लाख वर्ग कि.मी भाग दिला नंतर त्यांनी जम्मू काश्मीर मधला 2 लाख वर्ग की.मी इतका देशाचा भाग पाकाडयांनी लाटला.
नंतर काँग्रेसने एक असा कायदा आणला जो या देशाला नुकसानदायक ठरला.
यानंतर वफ्फ बोर्ड आणून 9 लाख वर्ग कि.मि इतकी जमीन वफ्फ ने लुटली..
देशातल्या हिंदूंना,दलितांना कश्याप्रकारे मूर्ख बनवलं हे कळतंय का..??
म्हणजे हिंदू बहुसंख्य असूनही फक्त एकी नसल्यामुळे मागे पडत गेला..
पण 2014 साली मोदीजी सत्तेत आले अन त्यांनी काँग्रेसने केलेली सगळी घाण साफ करण्यास सुरुवात केली.त्यांनी 2017 साली शत्रू संपत्ती कायद्यात सुधारणा करून सगळ्या शत्रू संपत्ती ताब्यात घ्यायला सुरवात केलीय.
सैफ अली खान ची 15000 कोटी रु. संपत्ती याचं कायद्याच्या आधारे जप्त करणार आहे.
कोणालाच माफी मिळणार नाहीय...
ना खाऊंगा ना खाने दूंगा..!
0 टिप्पण्या