शेळ्या मेंढ्यांसाठी पिकविमा योजनेप्रमाणे विमा योजना सुरू करावी - संजय वाघमोडे
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 28/01/2025 : सरकारने एक रुपया भरून पीक योजना शेतकऱ्यांसाठी सुरू केली आहे. त्याच धर्तीवर शेळ्या मेंढ्यांसाठी विमा योजना सुरू करून मेंढपाळांना मदत करावी. अशी मागणी यशवंत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व राज्यपाल नियुक्त मेंढपाळ समितीचे सदस्य संजय वाघमोडे यांनी केले. ते पोकले (तालुका पन्हाळा जि. कोल्हापूर) येथे यशवंत क्रांती संघटनेच्या शाखा शुभारंभानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. तत्पूर्वी त्यांच्या हस्ते नामफलकाचे अनावरण करण्यात आले. कार्यक्रमास सरपंच दत्तात्रय पाटील, कोल्हापूर जिल्हा संपर्कप्रमुख सुनील शेळके कोल्हापूर, जिल्हा उपाध्यक्ष दादासो गावडे, काशिनाथ वाघमोडे, पन्हाळा तालुका युवक अध्यक्ष अतुल धनगर,महादेव अनुसे, इ. उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक राजेंद्र कोळेकर सर यांनी केले संजय वाघमोडे बोलताना पुढे म्हणाले की शेळ्या मेंढ्यांवर वन्य प्राणी, तणनाशक किटकनाशक फवारणी, भटकी कुत्री, चोरी, रस्त्यावरून जाता येता होणारे अपघात, यामुळे शेळ्या मेंढ्या मृत्युमुखी पडून मेंढपाळांचे आर्थिक नुकसान होत आहे. शेळ्या मेंढ्यांना विमा संरक्षण नसल्यामुळे नुकसान भरपाई मिळत नाही त्यामुळे मेंढपाळांचे नुकसान होत आहे. तसेच नवीन शेळ्या मेंढ्यांचा व्यवसाय करायचं म्हटल्यास बँकांची शेळ्या मेंढ्यांचे विमा उतरणे हे सक्तीचे असल्याने बँकांच्या व महामंडळाच्या बिनव्याजी म्हणून घेतलेले कर्ज हे दरवर्षी विमा योजनेचे हप्ते भरण्यातच जात असल्याने बँकांचे कर्ज घेऊन शेळ्या मेंढ्यांचा व्यवसाय करणे परवडत नसल्यामुळे शासनाच्या बिनव्याजी योजनेचा लाभ होत नाही तरी लवकरात लवकर शासनाने शेळ्या मेंढ्यांसाठी विमा योजना सुरू करावी. अशी मागणी संजय वाघमोडे यांनी केली.
यशवंत क्रांती संघटना सर्व घटकांसाठी कार्यरत असून प्रामुख्याने धनगरवाडे व मेंढपाळांचे अनेक प्रश्न संघटनेच्या माध्यमातून मार्गी लागले आहेत. आणि लागत आहेत असे संपर्कप्रमुख सुनील शेळके यांनी सांगितले. प्रास्ताविक करताना राजेंद्र कोळेकर यांनी सांगितले की यशवंत क्रांती संघटना ही कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव संघटना आहे की ग्राउंड लेव्हल ला जाऊन गोरगरिबांसाठी काम करत आहे मेंढपाळ व जिल्ह्यातील दुर्गम धनगरवाडे यांचा आधारवड बनुन त्यांच्या संकटात मदत करत असल्याने गावोगावी समाज बांधव एकत्र येऊन यशवंत क्रांती संघटनेच्या शाखा स्थापन करत आहेत. यामुळे समाज एकजूट होत आहे. यापुढेही संघटनेच्या माध्यमातून असेच कार्य घडावे.
कार्यक्रमास शाखाप्रमुख संभाजी माने, अध्यक्ष सागर माने , उपाध्यक्ष विशाल माने , खजिनदार निखिल माने , सेकेटरी स्वप्ननील मानेअरूण माने दगडू धनगर अमर माने सागर पाटील सचिन पाटील अझर मुजावर किरण माने प्रशांत शिंदे प्रतिक पाटील अमोल पाटील, मोहित नाईक, अभिजीत मोहिते, सचिव सदाशिव दादू माने , सदस्य रामराव माने , सुभाष माने दादासो माने,रोहित सौरभ साळसकर, संतोष साळसकर, अमोल साळसकर सुदर्शन साळसकर, शुभम जानकर, उदय माने ,कमल धनगर, पुजा माने, पार्वती माने, मंगल माने, तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते,
0 टिप्पण्या