प्रयागराज महाकुंभमेळ्यात आकाश भाग्यवंत नायकुडे यांचा सहभाग
वृत्त एकसत्ता न्यूज
प्रयागराज दिनांक 27/01/2025 :
अकलूज तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर महाराष्ट्र राज्य येथून गेल्या 39 वर्षापासून अखंडपणे प्रसिद्ध होत असलेल्या साप्ताहिक अकलूज वैभव आणि पाक्षिक वृत्त एकसत्ता चे सहसंपादक आकाश भाग्यवंत नायकुडे हे उत्तर प्रदेश मधील प्रयागराज येथे सुरू असलेल्या "महाकुंभमेळा" मध्ये सहभागी झाले आहेत.
त्यांनी सोमवार दिनांक 27 जानेवारी 2024 रोजी सकाळी प्रयागराज येथील त्रिवेणी संगम मध्ये पवित्र स्नानाचा लाभ घेतला. अत्यंत दुर्मिळ असलेल्या या धार्मिक पर्वणीचा लाभ घेतानाचे त्यांचे फोटो व्हायरल होताच सर्व स्तरातून त्यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
0 टिप्पण्या