अकलूजमध्ये एफ एम प्रक्षेपक केंद्र स्थापनेसाठी खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 31/01/2025 : अकलूजमध्ये एफ एम प्रक्षेपक केंद्र स्थापनेसाठी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी मागणी केली.नुकतेच प्रसार भारतीने भारतभर एफ एम स्टेशन स्थापित करण्याची घोषणा केली आहे. त्या अनुषंगाने माढा लोकसभा मतदारसंघातील अकलूज शहरात एफ.एम.प्रक्षेपक स्थापित करण्याच्या मागणीसंदर्भात सुचना आणि प्रसारण (प्रसार भारतीचे) केंद्रीय मंत्री ना.अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली.
अकलूज शहरात दूरदर्शन रिले सेंटर (५०० वेंट) कार्यरत होते. अकलूज शहर हे दूरदर्शन सेंटर डी.एम.सी. सोलापूर (महाराष्ट्र) याच्या अधीन काम करत आहे. येथे दुरदर्शनचे साहित्य आणि टॉवर (मिनार) उपलब्ध आहे. ज्यातील एक एफ एम प्रक्षेपकासाठी राखीव ठेवले गेले आहे. यासर्व गोष्ट लक्षात घेऊन अकलूजमध्ये १ कि. वेंट किंवा १०० वेंट एफ एम प्रक्षेपक स्थापित करण्यास मान्यता द्यावी यामुळे पूर्ण मतदारसंघाला फायदा होईल अशी मागणी खासदार मा.धैर्यशील मोहिते-पाटील यांनी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली.
अकलूज आणि आसपासच्या पाच तालुक्यातील एकत्रित लोकसंख्येचा अंदाज १५ लाख आहे. जर अकलूजमध्ये १ कि. वेंट एफ एम प्रक्षेपक कार्यरत झाला तर, सर्वाधिक शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल. लोकांना आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, मनोरंजन, राजकीय तसेच पंतप्रधानांच्या मन की बात' सारखी महत्त्वाची माहिती मिळू शकेल. अकलूज एफ एम प्रक्षेपक असल्यास ५० किमी अंतरातील पाच तालुक्यातील शेतकऱ्यांना त्याचा मोठा फायदा होईल.
शेतकऱ्यांना रेडिओद्वारे अधिक माहिती मिळाल्यास त्यांना फायदेशीर ठरू शकते. तसेच, पंतप्रधानांच्या 'मन की बात' चा सुमारे १५ लाख लोकांना लाभ मिळू शकतो. या सर्व गोष्टीं खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी केंद्रीय मंत्र्यांना निदर्शनास आणून देत एफ.एम स्टेशन उभा करावे म्हणून मागणी केली.
0 टिप्पण्या