गृहविज्ञान महिला महाविद्यालयात 'वाचन संकल्प महाराष्ट्राचा' उपक्रमाचे आयोजन

 


गृहविज्ञान महिला महाविद्यालयात 'वाचन संकल्प महाराष्ट्राचा' उपक्रमाचे आयोजन

वृत्त एकसत्ता न्यूज

आकाश भाग्यवंत नायकुडे

मुंबई दिनांक 15 जानेवारी 2025 : शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज संचलित व एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठ, मुंबई संलग्नित श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील गृहविज्ञान महिला महाविद्यालयात 'वाचन संकल्प महाराष्ट्राचा' या महाराष्ट्र शासनाच्या अभिनव उपक्रमाअंतर्गत ग्रंथ वाचनाचे महत्व अधोरेखित करण्यासाठी व वाचन संस्कृती रुजविण्यासाठी दिनांक 1 ते 15 जानेवारी यादरम्यान  विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दिनांक 1 जानेवारी 2025 रोजी ग्रंथालयात ग्रंथ प्रदर्शनीचे विद्यार्थिनी व शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासाठी आयोजन करण्यात आले होते. दिनांक 3 जानेवारी 2025 रोजी वाचन कौशल्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेमध्ये विद्यार्थिनींनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. दिनांक 4 जानेवारी 2025 रोजी 'लेखक वाचक परिसंवाद' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी मार्गदर्शक लेखक म्हणून प्रसिद्ध कथाकार  तानाजी सावळाराम बावळे हे उपस्थित होते. याप्रसंगी त्यांनी लेखक व वाचकाची भूमिका विषद केली. दिनांक 6 जानेवारी 2025 रोजी 'सामुदायिक वाचन' उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दिनांक 10 जानेवारी 2025 रोजी सार्वजनिक वाचनालय भेटीचे आयोजन करण्यात आले होते. सदुभाऊ सार्वजनिक वाचनालय, अकलूज येथे आमच्या महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी भेट देऊन वाचनालयात उपलब्ध असलेल्या वाचन साहित्याची माहिती घेतली. दिनांक 15 जानेवारी 2025 रोजी 'पुस्तक परीक्षण व कथन स्पर्धे'चे आयोजन करण्यात आले होते.

स्पर्धांचे परीक्षण डॉ. अमित घाडगे, डॉ. छाया भिसे, डॉ. भारती भोसले, प्रा. के. के. कोरे यांनी केले.

याप्रसंगी अध्यक्षीय मनोगत प्रभारी प्राचार्य डॉ. राहुल सुर्वे यांनी केले. प्रास्ताविक व सूत्रसंचालन डॉ. ऋषी गजभिये यांनी केले तसेच आभार डॉ. जयशीला मनोहर यांनी मानले.

सदर 'वाचन संकल्प महाराष्ट्राचा' हा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यासाठी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. राहुल सुर्वे, ग्रंथपाल डॉ. ऋषी गजभिये, डॉ. जयशीला मनोहर, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. भारती भोसले, डॉ. छाया भिसे, डॉ. अमित घाडगे, प्रा. के. के. कोरे, प्रा. राहुल चव्हाण, रमजान शेख, दीपक शिंदे व विद्यार्थिनींनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या