सहकार महर्षि अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये 76 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 26/01/2025 : अकलूज (तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर) येथील सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च, शंकरनगर-अकलूज या अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये भारताचा ७६ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.प्रमुख अतिथी सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखाना, शंकरनगर चे व्हाईस चेअरमन शंकरराव रामचंद्र माने देशमुख यांच्या हस्ते ध्वज फडकविण्यात आला. यावेळी विश्वस्त मोहन लोंढे हे उपस्थित होते.
स्वागतपर प्रास्ताविकात प्राचार्य डॉ प्रविण ढवळे यांनी महाविद्यालयाच्या प्रगतीचा थोडक्यात आढावा घेत देश प्रगतीपथावर नेण्यासाठी सर्वांनी कार्यरत रहावे असे सांगितले.यावेळी कार्यालयीन अधिक्षक शब्बीर शेख, सर्व विभागाचे विभागप्रमुख, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. गौरव देशपांडे यांनी केले.
0 टिप्पण्या