जगताप 卐 होले शुभविवाह सोहळा थाटाने संपन्न
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 20/12/2024 : कै. अरविंद बाबुराव जगताप यांचे नातू व सौ मीना व वैभव अरविंद जगताप राहणार वडाळा महादेव, तालुका श्रीरामपूर, जिल्हा अहिल्यानगर यांचे चि. अक्षय आणि कै. वसंतराव बबनराव होले यांची नात व सौ कावेरी व अनिल वसंतराव होले राहणार घोरपडे पेठ, खडकमाळ आळी, पुणे यांची सुकन्या चि. सौ. कां. भक्तिप्रिया यांचा शुभविवाह सोहळा शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 रोजी दुपारी 12 वा. 05 मिनिट या शुभमुहूर्तावर अत्यंत थाटाने संपन्न झाला. अंबिका लॉन्स, हडपसर - सासवड रोड, दिवेघाट पायथा, वडकी, पुणे येथे संपन्न झालेल्या शुभविवाह सोहळ्याप्रसंगी सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून वधूवरांना शुभाशिर्वाद दिले.
0 टिप्पण्या