💢 महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पीक विम्याची थकीत नुकसान भरपाई ३० जानेवारीच्या आत द्या - शजोविमंशेस महासंघाच्या मागणीस यश 🟪 शरद जोशी विचार मंच शेतकरी संघटना महासंघाचे शेतकरी राज्यभर शेतकरी संवाद यात्रा आंदोलन सुरु

💢 महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पीक विम्याची थकीत नुकसान भरपाई ३० जानेवारीच्या आत द्या - शजोविमंशेस महासंघाच्या मागणीस यश

 🟪 शरद जोशी विचार मंच शेतकरी संघटना महासंघाचे शेतकरी राज्यभर शेतकरी संवाद यात्रा आंदोलन सुरु 

वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत नायकुडे

मुंबई दिनांक 31 डिसेंबर 2024 :  राज्यात २४८ कोटींचा पीक विमा  कंपनीकडे पेंडिंग.. संघटनेची कृषी आयुक्ताकडे तक्रार, ३० जानेवारी पूर्वी वाटप पूर्ण करण्याचे आश्वासन 30 डिसेंबर 2024 रोजी रात्री उशिरा आठ वाजता लिखित स्वरूपात देण्यात आले. त्यानुसार  पुणे आयुक्तालयासमोरील शरदजोशी विचारमंच शेतकरी संघटना महासंघ व समविचारी संघटनेचे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे असल्याची माहिती संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विठ्ठल राजे पवार यांनी दिली.


 


कृषी आयुक्तालयात कृषी आयुक्त यांच्या वतीने शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटना महासंघाचे निवेदन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा निमंत्रक विठ्ठल राजे पवार राजे यांच्याकडून निवेदन स्वीकारताना संचालक पवार साहेब,  बीड जिल्ह्याचे अध्यक्ष परमेश्वर पिसुरे, राज्य प्रसिद्धीप्रमुख  भाग्यवंत नायकुडे, सोलापूर जिल्हा प्रमुख श्रीकांत नलवडे. .... (छायाचित्र युवक अध्यक्ष अनिल भांडवलकर)

राज्यातील पीक विम्याचे थकीत रक्कम खालील जिल्हा निहाय, पुणे जिल्ह्याचे पाच कोटी सत्तावीस लाख, सोलापूर जिल्ह्याचे २ कोटी ७२ लाख, नाशिक जिल्ह्याचे १० कोटी ५४लाख, अहमदनगर जिल्ह्याचे २२ कोटी ५७ लाख, छत्रपती संभाजी नगर जिल्ह्याचे १ कोटी ७७ लाख, बीड जिल्ह्याचे ४ कोटी ९६ लाख, सातारा जिल्ह्याचे १ कोटी ७४ लाख रुपये तर राज्यातील एकूण २४८ कोटी २२ लक्ष रुपयाची पिक विमा कंपनीकडे थकबाकी असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष विठ्ठल राजे पवार यांनी प्रसिद्धी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. राज्यातील सर्वच जिल्ह्यातील पिक विमा कंपनीने थकीत पीक विमा वाटप पेंटिंग ठेवलेला आहे तो तत्काळ देण्याच्या संदर्भात कृषी आयुक्तालयाचे अधीकारी तांबे साहेब यांच्याशी चर्चा झाल्याच्या नंतर संबंधित विभागाला पेंडींग पिक विमा रकमा तत्काळ देण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत त्यानंतर कृषी आयुक्तालयाच्या लेखी विनंतीनुसार आंदोलन आतुरते स्थगित करून राज्यभर शेतकरी संवाद यात्रा सुरू ठेवणार असल्याची माहिती संघटनेने दिलेली आहे. शेतकरी जगला तरच राज्य व राष्ट्र जगेल. अन्नसुरक्षा हा सर्वात महत्त्वाचा विषय आहे याची सरकारने जाणीव ठेवावी.

तसेच महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट संपूर्ण कर्जमुक्ती व शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज पुरवठा व शेतमालाला किमान उत्पादन खर्च भरून निघेल इतका बेसरेट अर्थात गॅरंटी हमीभाव, माननीय महाराष्ट्र राज्य अन्न आयोग व मुंबई उच्च न्यायालय यांनी दिलेल्या आदेशानुसार मागण्या मान्य करून तसे आदेश द्यावेत, बाबतचे निवेदन कृषी आयुक्त सहकार आयुक्त साखर आयुक्त तसेच पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व राज्याचे मुख्य सचिव व केंद्र सरकारला दिलेली निवेदने देण्यात आली आहेत.

राज्यातील शेतकऱ्यांना सर सकट संपूर्ण कर्जमुक्तीसाठी व विवीध प्रलंबित मागण्या साठी राज्यातील सर्व विभागीय जिल्हाधिकारी तहसील प्रांत कार्यालयासमोर दिनांक ३० डिसेंबर २०२४ पासून शेतकरी एकजुटीने पुणे येथील कृषी, सहकार, पणन, पशुसंवर्धन दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय वस्त्र उद्योग पर्यावरण वन फॉरेस्ट सिंचन महावितरण डिस्ट्रीब्यूशन व परेशान तसेच पोलिस महासंचालक कार्यालया समोर बेमुदत सत्याग्रह आंदोलनाला सुरू करण्यात आलेली आहेत.संघटनेच्या वतीने राज्य सरकारकडे शेतकऱ्यांना सरसकट संपूर्ण कर्जमुक्तीसाठी, संघटनेने निवेदनाद्वारे मागणी केलेले आहेत

गाईच्या दुधाला ४८/- म्हशीच्या दुधाला ५८/-रुपये कापसाला १२५००/-तर सोयाबीनला ९५००/- प्रतिक्विंटल तर  उसाला विनाकपात ३६२६/- रुपये, कांद्याला २४१०/- रुपये प्रति क्विंटल दर मिळालाच पाहिजे, ५५ वर्षे वय असलेल्या शेतकऱ्यांना १२०००/- रुपये दरमहा पेन्शन मिळाली पाहिजे, शक्तिपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे त्याऐवजी आहे त्या महामार्गाचे रुंदीकरण वाढवा, शेतीला दिवसा सलग विद्युत पुरवठा मिळावा, यासह अधिक मागण्यांसाठी दिनांक ३० डिसेंबर रोजी कृषी सहकार पणन वस्त्रोद्योग कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.

यावेळी शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटना महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा निमंत्रक विठ्ठल राजे पवार, नगरविभागाचे अध्यक्ष जगन्नाथ कोरडे पाटील, राज्य प्रसिद्धी व प्रदेश उपाध्यक्ष भाग्यवंत नायकुडे, बीडचे परमेश्वर आप्पा पिसोरे, सोलापूर जिल्हा अध्यक्ष श्रीकांत नलवडे, नाशिक चे अण्णासाहेब खैरनार, नाशिक त्रिबकश्वरचे नंदू उदार, मारुती ताठे, पांडुरंग जाधव, बाळू नथू दिवे, विष्णू दिवे, सोलापूर राजाराम भाडमुखे, पुणे राणा प्रेमजीतसिंह राजे पवार, राजगुरुनगर विठ्ठल लोखंडे, पुणे जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब वर्पे पाटील, युवक अध्यक्ष अनिल भांडवलकर, तर सोलापूरचे राजाराम देशमुख, पुंडलिक जाधव, महेश बिस्किटे, हडपसर महेश गिरी, अमोल पिसाळ सातारा, छत्रपती संभाजी नगर चंद्रसेनभैय्या जाधव, दत्ता पुंडे पाटील पुणे जिल्हा संपर्कप्रमुख आंबेगाव तालुका अध्यक्ष चंद्रकांत लबडे पाटील, बाळासाहेब मगर तसेच यावेळी पुणे नगर नाशिक बीड सोलापूर सातारा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील प्रतिनिधी उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या