💢 पंढरपूर येथील संत नामदेव महाराज स्मारक व केशवराज मंदिरांचा अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला मार्ग मोकळा 🔰 दोन्ही गटाची उपस्थिती, प्रदेशाध्यक्ष महेश ढवळे यांच्या समन्वयाची भूमिका यशस्वी ठरली.

 💢 पंढरपूर येथील संत नामदेव महाराज स्मारक व केशवराज मंदिरांचा अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला  मार्ग मोकळा

🔰 दोन्ही गटाची उपस्थिती, प्रदेशाध्यक्ष महेश ढवळे यांच्या समन्वयाची भूमिका यशस्वी ठरली.

वृत्त एकसत्ता न्यूज 

भाळवणी / प्रतिनिधी दिनांक 28 डिसेंबर 2024 :

अनेक वर्षापासून केशव राजा मंदिर दोन गटाचा वाद अखेर प्रदेशाध्यक्ष महेश ढवळे यांच्या मध्यस्थीने दोघांच्या एकमताने मिटला संगोपनाची जबाबदारी दोन्ही गटाने उचलली याचबरोबर

शिंपी समाजाचा विकास व एकत्रीकरण करणे हा विषय बैठकीत घेण्यात आला. महाराष्ट्रात असलेली एकूण संख्या लक्षात घेता राजकीय क्षेत्रामध्ये शिंपी समाजाला स्थान मिळणे, नामदेव पायरी चे दर्शन विठ्ठलाच्या दर्शनाला जाण्याच्यापूर्वी होणे, 675 वा समाधी सोहळा हा मोठ्या उत्साहात साजरी करून महाराष्ट्रात वेगवेगळे समाज उपयोगी सामाजिक उपक्रम राबवणे , संत शिरोमणी नामदेव महाराज आर्थिक विकास महामंडळ गठित करण्यासाठी वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावा करणे, महाराष्ट्रात संत शिरोमणी नामदेव महाराजांची प्रलंबित असलेली बांधकामे यांना अर्थसहाय्य मिळवून देणे अशा वेग-वेगळ्या विषयावर चर्चा एकमताने पार पडून सर्वांची संमती दर्शवण्यात आली.

अखिल भारतीय नामदेव क्षत्रिय महासंघ केशवराजा संस्थान व महाराष्ट्रातील प्रमुख शिंपी समाजाची, पदाधिकाऱ्यांची   काल दिनांक २७ डिसेंबर शुक्रवार रोजी श्रीक्षेत्र पंढरपूर येथे संत नामदेव महाराज मंदिर येथे राष्ट्रीय अध्यक्ष नानासाहेब पाथरकर, प्रदेश अध्यक्ष अँड महेश ढवळे,  केशवराय संस्थेचे सचिव धनंजय जवंजाळ, नासपचे अध्यक्ष संजय नेवासकर, यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली बैठकीत सर्वप्रथम   श्री  पांडुरंगाचे पूजन  करण्यात आले यानंतर संत नामदेव महाराजांचे १६ वे वंशज ह भ प मुकुंद महाराज व माधव महाराज यांचा सत्कार करण्यात आला. या बैठकीला अँड अजय तल्हार,पंढरपूर समाज अध्यक्ष गणेश उंडाळे, जिल्हा अध्यक्ष राजेश धोकटे प्रदेश पदाधिकारी महादेव  खटावकर, मनोज भांडारकर, नंदकुमार कोसतवार, अनिल गचके, प्रभाकर नानोटे , संतोष मुळे ,अशोक खैरनार, होमकर कोरमर, विलास पोरे ,महेश गानबोटे, संजय चांडोले, भिकाजीराव गनबावले, जिल्हा महिला अध्यक्ष रेखाताई मुळतकर , बबीता माळवतकर, डॉ प्रज्ञा तल्हार ,अ भा युवक अध्यक्ष रुपेश बागुल, प्रदेश युवक अध्यक्ष अँड सिद्धार्थ भांबुरे, प्रभू सोनवणे,आ. भा. नामदेव छीपा महासभा राष्ट्रीय युवा संयोजक खेमराज नामा व अँड सागर मांढरे व सर्व जिल्हा अध्यक्ष  तालुका अध्यक्ष व संलग्नित संस्था  महाराष्ट्रातून २७ जिल्ह्यातील व तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची उपस्थिती  होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या