यादों की बारात भाग तीन

 


यादों की बारात भाग तीन 

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे

मुंबई दिनांक 28 डिसेंबर 2024 :

इचलकरंजी झालेल्या सुवर्ण महोत्सवी साहित्य संमेलनात बद्दल मी दोन छोटे लेख आपणास पाठवले होते ह जरा वेगळ्या विषयाचा लेख आहे त्यावेळी साहित्यिक आणि राजकारणी यांच्यातील संबंधाविषयी चर्चेचे व मतभेदाचा विषय झाला होता राजकारणी लोकांना साहित्यिकांच्या स्टेजवर परवानगी असू नये राजकारण साहित्य हे अलग विषय आहेत असे म्हणणारा एक मोठा वर्ग होता याउलट राजकारणी लोकाना सुद्धा  साहित्य विषयी गोडी असते असे म्हणणारा सुद्धा एक वर्ग होता. 

 त्यामुळे या वादाचा साहित्य संमेलनाच्या यशावर अगर कार्यक्रमावर परिणाम होऊ नये यासाठी संयोजकांची खूपच धावपळ झाली. 

माझ्या माहितीप्रमाणे यावेळी राजकारणी लोकांनी माघार घेतली व साहित्य संमेलनात सामान्य होऊन राहिले.

याचा परिणाम असा झाला  पुढील साहित्य संमेलन यशवंतराव चव्हाण यांच्या कराड येथे झाली पण हे साहित्य संमेलन आणीबाणीच्या काळात झाले असल्याने या साहित्य संमेलनात अतिशय वेगळ्या प्रकारचे वातावरण होते.

आणीबाणी असल्यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी झाली होती त्यामुळे साहित्य संमेलनात राजकारण ,सद्यस्थिती, आणिबाणी याविषयी कोणतीही चर्चा होणार नाही हे उघड होते 

 त्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा श्रीमती दुर्गाबाई भागवत होत्या व याचवेळी लोकनेते जयप्रकाश नारायण यांची प्रकृती तुरुंगात अतिशय खालावली होती अशी बातमी बाहेर आली होती त्यामुळे जयप्रकाश नारायण यांच्या प्रकृतीला आराम पडावा म्हणून श्रीमती भागवत यांनी स्टेजवरून जाहीर आवाहन करून  जयप्रकाश नारायण यांच्या प्रकृतीची सुधारणा व्हावी म्हणून परमेश्वराकडे प्रार्थना असा कार्यक्रम केला त्यावेळी चे उपपंतप्रधान स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांना व अन्य राजकारणी लोकांना यासाठी यासाठी उभारावे लागले होते. 

ही घटना आणीबाणीविरुद्ध काम करणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांना अनेक दिवस प्रेरणा देणारी ठरली होती.

 त्यामुळे इचलकरंजी सुवर्ण महोत्सवी साहित्य संमेलन जो राजकारणी व साहित्यिक हा वाद निर्माण झाला होता त्यावर कराडचे साहित्य संमेलनाने कळस चढवला.

1974 साली राजकारणी राजकारण करत ते क्रीडाक्षेत्र, साहित्य ,शिक्षण या विषयात शक्यतो लक्ष घालत नसत पण त्यानंतर राजकारणी लोकांची हाव वाढली व त्यांनी सर्व क्षेत्रे पादक्रांत करण्यास सुरुवात केली मग शिक्षण संस्था क्रीडा संस्था ताब्यात घेतल्या त्यातून मोठी माया गोळा केली व समाजाला एक वेगळ्याच वळणावर नेऊन ठेवले.

 आता विचार केला तरी आश्चर्य वाटते की  साहित्य संमेलनात राजकारणी लोकांना बाजूला ठेवण्यात संयोजकांना यश आले होते याबद्दल मोठ्या मनाच्या राजकिय व्यक्तीनी सुद्धा त्यांना सहन केले होते.

 हे सर्व आज आठवण्याचे कारण म्हणजे साहित्य संमेलनात महत्त्वाचा विषय राजकारणी की साहित्य हा झाला होता त्यानंतर मात्र यातून धडा घेऊन राजकारणी लोकांनी साहित्य क्षेत्र काय पण सर्वच क्षेत्रे सत्ता व पैसा यावर आपल्या कब्जात घेतली आहेत.

 माझ्या माहितीप्रमाणे हे शेवटचे संमेलन झाले त्यानंतर आता कोणत्याही साहित्य संमेलनात राजकारण्याशिवाय पान हालत नाही याचे कारण साहित्य संमेलनात होणारे प्रचंड खर्च व साहित्यिकात व त्यांच्या संस्थात असणारी राजकारणाची लगट 

ॲड अनिल रुईकर 

98 232 55049 

इचलकरंजी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या