🔰 पंदरवाडी ते मारकडवाडी

 

🔰 पंदरवाडी ते मारकडवाडी 

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे

मुंबई दिनांक 23 डिसेंबर 2024 

 आपणास भारताचे अल्पकालीन पंतप्रधान चंद्रशेखर यांचे नाव आठवत असेल. या चंद्रशेखरजीनी1978ला जनता पक्षाची सत्ता गेल्यानंतर  केरळ टू काश्मीर पदयात्रा काढली होती. ही पद यात्रा त्याकाळी फार गाजली होती.  या पदयात्रेवर डाव्या विचारसरणीचे व समाजवादीतील विचारसरणीचे कार्यकर्त्यांचा पगडा होता. या पदयात्रेस आपल्या देशातील नागरिकांनी प्रतिसाद दिला व चंद्रशेखरजींना देणगी दाखल लाखो रुपये गोळा करून दिले. पदयात्रेच्या खर्चातून मोठी रक्कम शिल्लक राहिली ती लोणावळा खोपोली परिसरात असणाऱ्या एका पंदरवाडी नावच्या गावामध्ये या पदयात्रेची स्मृती म्हणून एक संस्था स्थापन करण्यात आली व त्या संस्थेमार्फत कार्यकर्त्यांना प्रशिक्षण व कार्यकर्त्यांची जडणघडण यासाठी कार्य करण्याचे ठरले. 

त्यावेळी आता सारखा मीडिया नव्हता तरीसुद्धा आता पंदरवाडी तील ही संस्था देशात क्रांती घडवणार अशी दिवास्वप्न समाजवाद्यानी पाहण्यास सुरुवात केली. त्या पद्धतीने फुगा फुगवण्यात आला होता. त्या पद्धतीने तू फुगा फुटला. 

 *पंदरवाडी क्रांती

 ही इतिहास जमा झाली. आताच्या राजकीय कार्यकर्ते व विचारवंत यांना पंदरवाडी हा विषय माहिती तरी आहे काय?  आता पंदरवाडीची आठवण यायचे कारण म्हणजे निकाल लागल्यानंतर दरवेळी प्रमाणे ईव्हीएम च्या नावाने विधवा विलाप सुरू झालेला आहे.

 *राजकीय टुरिझम

मारकडवाडी (ता. माळशिरस, जिल्हा सोलापूर, महाराष्ट्र राज्य) नावाच्या गावात संविधान प्रमाण मानणाऱ्या शरद पवारांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मतपत्रिकेवर मतदान ची घोषणा केली व दोन चार दिवस चाय बिस्कीट पक्षकारांनी त्यास  प्रचंड प्रसिद्धी दिली. लगेच राजकीय टुरिझम सुरू झाला.

 आज शरद पवार उद्या आदित्य ठाकरे परवा दिवशी नाना पटोले एकामागून एक पराभूतांचे सरदार मारकडवाडीला गेले. मारकडवाडीच्या लोकसंख्येच्या कितीतरी पटीने गर्दी गोळा केली गेली.

 देशभर मारकडवाडी पॅटर्न वापरून क्रांती होणार हे मुंबईत  बसून एक नेते बडबडू लागले. प्रशासनाने पर्यायी व्यवस्था याच्या विरुद्ध पाऊल उचलले. नाहीतर हे उद्या राष्ट्रपतीची पर्यायी निवडणूक घेतील.

 काही गणपती दीड दिवसाचा असतो व काही गणपती दहा दिवसांच्या असतात.  तेवढाच उत्सव पार पाडला जातो. तसा मारकडवाडी चा गणपती सात दिवस पण राहिला नाही. मारकडवाडी च्या  क्रांतीचे विसर्जन झाले. 

आता नवीन गणपतीच्या शोधात व नवीन उत्सवाच्या शोधात हे ईव्हीएम च्या नावाने विधवा विलाप करणारे नेते आहेत. 

 पंदरवाडीतून क्रांती तिथे फसली तेथे मारकडवाडी काय करणार ?

सत्याला सामोरे न जाता प्रसिद्धीपासून दूर राहून पक्षासाठी त्याग करणे हे न करता केवळ प्रसिद्धी व गाजावाजा म्हणजेच पक्षकार्य असे समजणाऱ्या महाआघाडीच्या नेत्यांना जनतेने शहाणे केले आहे. पण देव याना शहाणपणा केव्हा देणार 

 अर्थात हे देव मानत असले तर 

धन्यवाद!

 ॲड अनिल रुईकर 

98 232 550 49

 इचलकरंजी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या