ग्रीन फिंगर्स कॉलेज तर्फे स्कूल कनेक्ट कार्यक्रमाचे आयोजन
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 30 डिसेंबर 2024 :
ग्रीन फिंगर्स कॉलेज तर्फे स्कूल कनेक्ट कार्यक्रमांतर्गत बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी करियर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी एक प्रभावी करिअर मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित केली गेली. आजच्या जलद विकसित जगात पारंपारिक करिअर मार्ग हाच एकमेव पर्याय राहिलेला नाही. आर्टिफिशल इंटलिजन्स डिजिटल मार्केटिंग ग्राफिक्स डिझाईन या क्षेत्रातील करियर फायदेशीर म्हणून उदयास आले आहेत याची माहिती उपस्थित विद्यार्थ्यांना देण्यात आली. या कार्यशाळेत नवीन करिअरच्या संधी व त्यामध्ये येणारे नवीन नवीन सॉफ्टवेअर मधील बदल तसेच करिअरमधील आवश्यक कौशल्याची माहिती देण्यात आली. या कार्यशाळेत अशा व्यक्तींची उदाहरणे देण्यात आली. ज्यांनी नवीन काळातील करिअरमध्ये प्रवेश केलेला आहे . या कार्यशाळे च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना चौकटी बाहेर विचार करण्यास प्रेरित केले गेले .
ही कार्यशाळा माळशिरस, अकलूज, नरसिंगपूर, टेंभुर्णी इत्यादी अनेक गावातील विविध महाविद्यालयांमध्ये घेण्यात आली .
या कार्यशाळेमध्ये नवीन शैक्षणिक धोरण व त्यामधील बदल याची माहिती विद्यार्थ्यांना दिली तसेच शैक्षणिक धोरणानुसार शैक्षणिक व नवीन तंत्रज्ञानानुसार असणाऱ्या करिअर संधी विषयी मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते .या कार्यशाळेला विद्यार्थ्यांचा उत्साहपूर्ण प्रतिसाद मिळाला.
0 टिप्पण्या