यादों की बारात
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 25 डिसेंबर 2024 :
१९७२ सालची गोष्ट आहे मी त्यावेळी सुमारे वीस वर्षाचा होतो व माझे महाविद्यालय शिक्षण सुरू होते
*आरसा आणि कॅमेरा
आपणास माहित असेलच जगात दोन वस्तू असे आहेत की त्यापुढे जो उभारत नाही तो फक्त जन्मांन्ध असावा. एक कॅमेरा व दुसरा आरसा. या दोन वस्तू अशा आहेत यापुढे आपणा सर्वांना त्या समोर उभारण्यामध्ये जो आनंद मिळतो तो कशातही मिळत नाही. कॅमेऱ्यापुढे व आरशात आपण स्मार्ट आहोत असा भास होतो.
त्यामुळे मी फोटोग्राफी करण्याचे ठरवले. त्यावेळी इचलकरंजीतील युनायटेड बँकेत महाजनी नावाचे मॅनेजर होते. ते संघाचे स्वयंसेवक होते. मला पॉकेट मनीला पैसे कमी पडायचे म्हणून मी युनायटेड वेस्टर्न बँकेतून सात हजार रुपये कर्ज काढून फोटो स्टुडिओ सुरू केला होता. गळ्यात कॅमेरा अडकवून निरनिराळे कार्यक्रम, लग्न समारंभ याचे फोटो काढायचे, अल्बम तयार करून द्यायचे व त्या काळात कर्जाचा हप्ता फिटुन सुमारे 100-150₹ शिल्लक रहात.
स्माईल करा ,ओठांवरती जिभ फिरवा (स्वतःच्या), जवळ घ्या, खांद्यावर हात ठेवा अशा चावट सुचना करत मी लग्न समारंभात फोटोग्राफी करत फिरावयाचो.
त्याचवेळी शिक्षण सुरू होते. मी कर्ज काढून फोटोग्राफी करतो हे घरच्या लोकांना माहीत नव्हते. स्टुडिओची डार्क रूम मोठ्या तळ्यावर होगाड्यांच्या माडीवर होती.
आज याची आठवण यायची कारण म्हणजे 1974 साली इचलकरंजीला सुवर्ण महोत्सवी साहित्य संमेलन झाले. अविस्मरणीय अशा कार्यक्रमाची मी फोटोग्राफी केली आहे.
ज्यावेळी इचलकरंजीला साहित्य संमेलन करण्याचे ठरले त्यावेळी मी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता होतो. आमची 50- 60 कार्यकर्त्यांची कार्यक्षम टिम होती. आम्ही डॉक्टर मर्दा यांच्या नेतृत्वाखाली साहित्य संमेलनाच्या पूर्वतयारीत झोकून दिले. साहित्य संमेलन जोरदार पार पडले. याचे सर्व श्रेय डॉ. मर्दा याना द्यावे लागेल.
वसंतराव दातार , राजाभाऊ दातार गजाननराव कांबळे यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टर मर्दा ,डॉक्टर लांडे, डॉक्टर साखरपे, डॉक्टर कलकटकर, प्रताप होगाडे व आमच्यासारखे फुटकळ कार्यकर्ते या सर्वांनी मिळून तीन चार महिने तहानभूक विसरून साहित्य संमेलनाची पूर्वतयारी केली.
डॉक्टर लांडे यांचा आज आहे तेथे बंगला नव्हता तिथे एक मोठा हॉल होता. तेथे साहित्यसंम्मेलनाचे कार्यालय करण्यात आले. इचलकरंजीत सार्वजनिक कामाला कधीही पैसा कमी पडत नाही.
डॉक्टर लांडे कोषाध्यक्ष होते. डाॅ मर्दा व त्यांची टीम यांनी यांनी अक्षरशः हजारो रुपये उभे करून साहित्य संमेलन मोठ्या दिमाखाने व इचलकरंजी परंपरेला शोभेल असे पार पाडले.
साहित्य संमेलनात मी कार्यकर्ता म्हणून तर काम केलेच पण साहित्य संमेलनाचे तीनही दिवसाचे फोटो काढणेचे काम पण केले. त्यावेळी या फोटोचे मी दोन अल्बम केले एक अल्बम साहित्य संमेलनाच्या कार्यालयात दिला व दुसरा अल्बम माझ्या संग्रही ठेवला.
आज पाहता पाहता साहित्य संमेलनास पन्नास वर्षे पूर्ण होत आहे. जुन्या सर्व आठवणी आठवल्या या सर्व फोटोमध्ये मी कोठेही नाही कारण मी फोटोग्राफर होतो. माझ्या संग्रहात आल्बम आहे. व्यक्ती अगर संस्था स्वखर्चाने प्रिंट काढून घेणार असतील तर ऊपलब्ध.
या लेखाचा दुसरा भाग उद्या प्रसारीत करत आहे.
आज इतकेच
ॲड अनिल रुईकर
इचलकरंजी
9823255049
0 टिप्पण्या