साहित्यिक आणि राजकारणी

 

साहित्यिक आणि राजकारणी 

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे

मुंबई दिनांक 29 डिसेंबर 2024 : मी कालच्या लेखामध्ये साहित्यिक व राजकारणी याविषयी लेखन केले होते.  आपल्या देशात अशी परिस्थिती निर्माण झाली की आपले क्षेत्र सोडून आणि क्षेत्राबद्दल काम करणे अगर त्या क्षेत्रातील चाललेल्या कामात ढवळाढवळ करणे व आपणास सर्व क्षेत्रातील ज्ञान कसे आहे हे दाखवणे हे आता सातत्याने सुरू आहे असे असताना आपण ज्यावेळी काही व्यक्तीने राजकारणी व्यक्तींनी साहित्य क्षेत्रात ढवळाढवळ करू नये लक्ष घालू नये असे म्हणतो त्यावेळी हे साहित्य क्षेत्राला पण लागू आहे. अनेक साहित्यिक राजकारणी होऊन राहिले आहेत. ते देशाच्या राजकारणात पण आपले विचार मांडत असतात व त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातील कामकाजात राजकारण करत असतात 

1974 साली इचलकरंजी येथे झालेल्या साहित्य संमेलना साहित्य व राजकारण याविषयी बराच गर्दारोळ उठला होता त्यानंतर 75 ला आणीबाणी आल्यावर सर्व साहित्यिक संपादक व तथाकथित पत्रकार यांनी केला अंगचोरपणा सुरू केला त्यांनी आणीबाणी विषयी बोलण्याचे लिहिण्याचे टाळले व कातडीबचाऊपणा केला  कराडच्या साहित्य संमेलनातील श्रीमती दुर्गाताई भागवत यांच्या एका कृती शिवाय अन्य कोणी साहित्यिकांनी आणीबाणी विरुद्ध आवाज उठवलेसे लक्षात येईल असे घडले नाही.  पण 77 ची सार्वत्रिक निवडणूक लागली आणि सिने व साहित्य क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी आणीबाणीचे विरुद्ध जनता पक्षाच्या प्रचारामध्ये मोठ्या प्रमाणावर भाग घेतला अनेक  घटनांमुळे व साहित्यिक व सिनेक्षेत्रातील व्यक्तींच्या योगदानामुळे 77 साली जनता पक्ष प्रचंड बहुमताने सत्तेवर आला 77 साली अनेक साहित्यिकांनी जनता पक्षाचा प्रचार केला की काळजी गरज होती 

पण त्यानंतर 80 साली अनेक साहित्यिकांनी आपल्या मानमर्यादा सोडून पुन्हा जनता पक्षाच्या प्रचारात लक्ष घातले ही मोठीचूक होती कारण त्यावेळी लक्ष घालणे आवश्यक नव्हते त्यानंतर मात्र जसे राजकारणी लोकांनी साहित्य क्षेत्रात आपली मनमानी सुरू केली तशी साहित्यिकांनी पण आपण कोणतरी वेगळे आहोत दाखवण्यासाठी राजकारणात आपले विचार मांडावयास सुरुवात केली अध्यक्षपद मिळाले याचा वापर देशातील व जगातील सर्व घटना बद्दल आपले मत दिले नाही तर ते चूक ठरेल अशा खोट्या अंहकाराकारापोटी साहित्यिकांनी राजकारणाबद्दल बोलण्यास सुरुवात केली 

आपल्या देशात पत्रकार साहित्यिक व राजकारणी त्यांना विशिष्ट व्याख्या नाही यांना विशिष्ट कर्तृत्व नाही एखादी बातमी तयार केली की तो पत्रकार होतो पत्रकार व वार्ताहार यामधील फरक कोणाच्याही लक्षात आला नाही असे वाटते  अनेक वार्ताहर स्व:ताला पत्रकार समजतात व अनेक स्फूट लेखक स्वतःला साहित्यिक समजतात गल्लीबोळा काम करणारे छोटे-मोठे कार्यकर्ते स्वतः राजकारणी समजतात कोणती परीक्षा नाही कोणतीही कसोटी नाही असे असताना कोणीही पत्रकार होऊ शकतो व राजकारणी होऊ शकतो.

 डॉक्टर वकील इंजिनियर होण्यास काही ना काही तरी परीक्षा द्याव्या लागतात पोलिसात सैन्य  भरती होताना अनेक परीक्षांना तोंड द्यावे लागते पण पत्रकार साहित्यिक व राजकारणी व्हायला कोणतीही परीक्षा नाही कोणती कसोटी नाही त्यामुळे हा नव्याने तयार झालेला पत्रकारांचा राजकारण्यांचा व साहित्यिकांचा वर्ग सर्व क्षेत्रात आपली अक्कलपाजळत आहेत ज्याप्रमाणे राजकीय व्यक्तीनी साहित्याबद्दल बोलू नये साहित्य क्षेत्रात हस्तक्षेप करू नये अशी आपली अपेक्षा असतील त्याप्रमाणे साहित्यिक मंडळींनी आपल्या देशाच्या पंतप्रधानांना शहाणपण शिकवण्याची काही कारण नाही राम मंदिरापासून, अनेक कायद्याबद्दल,हिंदुत्वा ,पंतप्रधान या बद्दल सुद्धा हे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आपले विचार मांडत असतात साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ची मुदत एक वर्षाची असते पण आपण अमर पट्टा घेऊन असल्यासारखा वागत असतो सर्वांनीच आपापल्या मर्यादा पाळल्या पाहिजे हा राजकारण की साहित्यिक या विषयावरचा तोडगा आहे 

 ॲड. अनिल रुईकर 

98 232 55 049

 इचलकरंजी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या