उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींचा सन्मान करण्याचा उपक्रम स्तुत्य : स्वरूपाराणी मोहिते पाटील

उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींचा सन्मान करण्याचा उपक्रम स्तुत्य : स्वरूपाराणी मोहिते पाटील 

वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत नायकुडे

मुंबई दिनांक 28 डिसेंबर 2024 :

विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या तरुणांना त्या त्या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य व्यक्तींकडून मार्गदर्शन मिळावे, प्रेरणा मिळावी यासाठी अशा उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींचा सन्मान करण्याचा हा उपक्रम स्तुत्य असल्याचे मत शिक्षण प्रसारक मंडळाच्या संचालिका स्वरूपाराणी मोहिते पाटील यांनी व्यक्त केले.

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ आणि भारतीय वंचित जन संसद यांच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त स्वरूपाराणी मोहिते-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पुरस्कार वितरण सोहळा पार पडला यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी भारतीय जन संसदचे संस्थापक डॉ. अंबादास सगट, अकलूज नगर परिषदेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे, रामलिंग सावळजकर, जिल्हाध्यक्ष सोमनाथ खंडागळे या प्रमुख मान्यवरांसह सदस्य व नागरिक उपस्थित होते. प्रास्ताविकात उपाध्यक्ष शशिकांत कडबाने यांनी पुरस्कार वितरण सोहळ्याचा उद्देश सांगत पत्रकार सेवा संघाच्या प्रगतीचा आढावा घेतला. 

भारतीय वंचित जन संसदचे संस्थापक डॉ. अंबादास सगट यांनी  ज्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाने स्वतःच्या कर्तृत्वाने भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात वेगळा ठसा उमटवला अशा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त दिला जाणार्या या पुरस्कारांचे एक वेगळे महत्त्व आहे. या पुरस्काराने आपल्या कार्यास उंची प्राप्त झाली असून ज्यांना पुरस्कार मिळाला त्यांनी आपापल्या क्षेत्रात आणखी यश संपादन करीत नावलौकिक मिळवावा तर उपस्थित तरुणांनी प्रेरणा घेऊन यश मिळविणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले.

यावेळी प्राध्यापक रामलिंग सावळजकर यांनी ज्ञानदानाच्या प्रमुख कार्याबरोबरच अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यात सातत्याने काम केल्याने विविध राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आपण कष्ट जिद्द व सातत्याने कार्य केल्यास त्याची नोंद घेतली जातेच म्हणून आपापल्या क्षेत्रात आत्मविश्वासाने व प्रामाणिकपणे काम करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले.

सुत्रसंचलन प्रा. राजाराम गुजर यांनी केले आभार अध्यक्ष सोमनाथ खंडागळे यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या